Bigg Boss Marathi 5 : वर्षा उसगावकर, कोकण हार्टेड गर्ल अंकितापर्यंत ; 'हे' आहेत १६ स्पर्धक

'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचे 'हे' आहेत १६ महारथी
Bigg Boss Marathi 5
'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनचे १६ स्पर्धकांबद्दल जाणून घ्या Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी टेलिव्हिजन विश्वातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो 'बिग बॉस मराठी'ची प्रतीक्षा अखेर संपली आहे. 'बिग बॉस मराठी'च्या नव्या सीझनमध्ये एका पेक्षा एक अवलिया सदस्य सहभागी झाले आहेत. वेगवेगळ्या छटा असलेले हे सदस्य यंदाचा सीझन चांगलाच गाजवणार आहेत. जाणून घ्या या 16 महारथींबद्दल...

वर्षा उसगावकर : मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ गाजवणाऱ्या 90 च्या दशकातील महानायिका वर्षा उसगांवकर या 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणाऱ्या पहिल्या सदस्य ठरल्या आहेत. स्वप्नसुंदरी, महिलांची लाडकी स्टाईल आयकॉन आणि ड्रीमगर्ल अशी वर्षा उसगावकर यांची ओळख आहे. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर अशा अनेक दिग्गांजासोबत त्यांनी स्क्रीन शेअर केली आहे.

वैभव चव्हाण : महाराष्ट्राच्या मातीतला बारामतीचा रांगडा गडी म्हणजेच अभिनेता वैभव चव्हाण. वैभव चव्हाणने आपल्या कातिल लूकने सर्वांनाच घायाळ केलं आहे. लढवैया, बिनधास्त आणि जिद्दी व्यक्तिमत्त्व असणारा वैभव 'बिग बॉस मराठी'चा खेळ कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अरबाज पटेल : रिअॅलिटी शोचा स्टार, स्प्लिट्सविलाची जान म्हणजेच अरबाज पटेल. अरबाजने आपल्या स्टाईल आणि स्वॅगने अनेकांना घायाळ केलं आहे. अरबाजचे अनेक म्युझिक अल्बम देखील प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. हा जिगरबाज तरुण 'बिग बॉस मराठी'च्या घरात धुमाकूळ घालण्यासाठी आता सज्ज आहे.

घनश्याम दरवडे : गर्दी जमवणारा, सभा गाजवणारा, व्यासपीठावरुन भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या छोट्या पुढारीची 'बिग बॉस मराठी'च्या घरात एन्ट्री झाली आहे. छोटा पुढारी म्हणजे घनश्याम दरवडे. घनश्याम दरवडेच्या प्रत्येक स्टेटमेंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असतो. आपली मतं रोखठोक मांडणारा, मोठमोठ्या नेत्यांना चॅलेंज देणारा हा एक स्पर्धक आहे.

इरिना रूडाकोवा : 'बिग बॉस मराठी'च्या पहिल्यांदाच एका 'परदेसी गर्ल'ची एन्ट्री झाली आहे. इरिना रूडाकोवा बऱ्याच वर्षांपासून भारतात राहतेय. इरिना सॉलिड परफॉर्मर, कमालीची डान्सर आणि अभिनेत्री आहे.

निक्की तांबोळी : आपल्या सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी डोंबिवलीची मराठी मुलगी आता हिंदी बिग बॉसमध्ये अनेकांना टक्कर देत टॉप थ्री मध्ये पोहोचली होती. बोल्ड, बिनधास्त आणि सुंदर असलेल्या निक्कीने आयुष्यातील तिचे नियम स्वत:च ठरवले आहेत.

अभिजीत सावंत : अभिजीत सावंतने आपल्या आवाजाने संपूर्ण भारताला वेड लावलं. टेलिव्हिजनचा लोकप्रिय सिंगिंग स्टार म्हणून तो ओळखला जातो. अभिजीत सावंत भारताचा पहिला सिंगिंग आयडॉल आहे.

पंढरीनाथ कांबळे : हास्यसम्राट पंढरीनाथ कांबळेने मालिका, नाटक आणि चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा काम केलं आहे. वेगवेगळी कॅरेक्टर्स करणारा हा माणूस स्वतःच एक कॅरेक्टर आहे.

आर्या जाधव : रॅपची राणी म्हणजे आर्या जाधवची स्टाईलच हटके आहे. शब्दांवरची तिची पकड तिच्या प्रत्येक रॅपमध्ये दिसून येते. आर्या प्रचंड रोखठोक आहे. रॉकस्टार म्हणून सोशल मीडियावर ती चांगलीच लोकप्रिय आहे.

योगिता चव्हाण : योगिता चव्हाण 'कलर्स मराठी'वरील 'जीव माझा गुंतला' या मालिकेत नायिका म्हणून झळकली. सर्वगुणसंपन्न, हवीहवीशी वाटणाऱ्या तिच्या अंतरा या भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली. आता रिक्षाचा गियर बदलून सुसाट प्रवास करायला ती सज्ज आहे.

जान्हवी किल्लेकर : 'कलर्स मराठी'वरील 'भाग्य दिले तू मला' या मालिकेत जान्हवी किल्लेकरने सानियाची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या खलनायिकेचं प्रेक्षकांनी खूप कौतुक केलं. सर्वांना पुरून उरणारी आणि आपल्या डोळ्यांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अशी ही जान्हवी किल्लेकर आहे.

अंकिता प्रभू - वालावलकर (कोकण हार्टेड गर्ल) : कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता प्रभू-वालावलकर एक लोकप्रिय इन्फ्लुएंसर आहे. मालवणचा चेडू अंकिता प्रभू वालावलकर आता बिग बॉस मराठीच्या घरात कोकणी हिसका दाखवायला सज्ज आहे.

Administrator

निखिल दामले : कलर्स मराठीच्या 'रमा राघव' या मालिकेत निखिल दामले मुख्य भूमिकेत होता. राघवचं पात्र त्याने साकारलं होतं. आजवर आपल्या दर्जेदार अभिनयाने त्याने प्रेक्षकांवर भुरळ पाडली आहे.

धनंजय पोवार : गावरान भाषा जपणारा कोल्हापूरचा बिजनेसमन म्हणजेच धनंजय पोवार. उद्योजक ते फेमस रील स्टार असा प्रवास करणारा कोल्हापुरी गडी आहे. घरी आई आणि बायकोच्या आदेशाबाहेर न जाणारे धनंजय पोवार आता बिग बॉसचे आदेश देताना दिसणार आहेत.

पुरुषोत्तमदादा पाटील : किर्तनकार पुरुषोत्तमदादा पाटील यांचे भाषण ऐकायला व्यासपीठावर लाखोंची गर्दी होते. महाराष्ट्राच्या लाडक्या किर्तनकाराला लाखो भक्त फॉलो करतात. किर्तनकाराचा वारसा लाभलेला तो आजच्या तरूणांचा गुरू आहे. आळंदी, पुणे, मुंबई, रायगड येथील मठांचा तो प्रसिद्ध मठाधिपती आहे.

सूरज चव्हाण : टिक टॉकचा पहिल्या दहात स्थान मिळवणारा स्टार अर्थात गुलीगत सूरज चव्हाण. सूरज चव्हाणचा मोठा चाहतावर्ग आहे. टिक टॉकचे रेकॉर्ड मोडणारा, अस्सल मराठी मातीतला स्टार सूरज चव्हाण आता बिग बॉस मराठीचं घर गाजवायला सज्ज आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news