.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क : 'बिग बॉस ओटीटी ३'च्या फिनालेसाठी दोन दिवस बाकी राहिले आहेत. त्याआधी अरमान आणि लव केश घराबाहेर झाले आहेत. जियो सिनेमाचा चर्चित शो ‘बिग बॉस ओटीटी ३’ जेव्हापासून रिलीज झाला आहे, तेव्हाासून गोंधळ पाहायला मिळत आहे. या शोमध्ये अनेक वळणे आली. दरम्यान, असे वृत्त समोर येत आहे की, बिग बॉस फिनाले होण्यासाठी २ दिवस बाकी आहेत. पण, फिनाले जवळ आल्यानंतर घरातील दोन सदस्य अरमान मलिक आणि लवकेश बेघर झाले आहेत. (Bigg Boss OTT 3)
बिग बॉसची क्षणाक्षणांची माहिती देणाऱ्या फॅन पेजवर या गोष्टीची माहिती देण्यात आली आहे. विशालच्या घराबाहेर गेल्यानंतर युजर्सनी या गोष्टीवर नाराजी व्यक्त केली. विशाल एलिमिनेट होऊ नये असे त्यांना वाटत होते. पण, फॅन्स हे एकून खुश होताहेत की, विशालनंतर आता बिग बॉस हाऊसमध्ये त्याचा शत्रू देखील बेघर होणार आहे. आणि आता शोमधून अरमान मलिक एलिमिनेट झाला आहे. आता घरात सना मकबूल, साई केतन राव, रणवीर शौरी, कृतिका मलिक आणि नेजी यांच्यात स्पर्धा आहे.
अरमान मलिक-लवकेश कटारियाच्या फॅन्सना अपेक्षा होत्या की, दोघे बिग बॉस ओटीटी ३ मध्ये खूप पुढेपर्यंत प्रवास करतील. पण, दोघेही फिनालेच्या आधी बाहेर झाले आहेत. मित्र लवकेश बिग बॉस बाहेर पडल्याचे वृत्त मिलताच एक्स ओटीटी विनर एल्विश यादव नाराज आहे. एल्विश यादवने एक पोस्ट शेअर केले आहे. त्याने लिहिलं- मतांच्या आधारावर बाहेर काढू शकला नाही?