Thoda Tuza Ani Thoda Maza |थोडं तुझं आणि थोडं माझं मालिकेत सुरु झालीय लगीनघाई

बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीने घेतला लग्न करण्याचा निर्णय
Thoda Tuza Ani Thoda Maza tv serial
Instagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झालीय. खरतर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावं, तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. (Thoda Tuza Ani Thoda Maza)

Thoda Tuza Ani Thoda Maza tv serial
HBD Sonu Sood | बर्थडेला सोनू सूदचे फॅन्सना गिफ्ट, 'फतेह'ला मिळाली रिलीज डेट

मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्न पाहिली आहेत. वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास तयार झालीय.

Thoda Tuza Ani Thoda Maza tv serial
Bigg Boss Marathi Day 2 : घरात रोमँटिक वातावरण तयार झाले अन् निक्की..

मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेचं मानसीचं ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्नं पाहिलंचं नाही. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल असं तिचं मत आहे. मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणार आहे. कसा असेल मानसीचा यापुढील प्रवास हे जाणून घेण्यासाठी मालिका रात्री ९ वाजता पाहता येईल.

Thoda Tuza Ani Thoda Maza tv serial
Nikki Tamboli ने Bigg Boss Marathi 5 मध्ये दाखवल्या दिलखेच अदा (Video)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news