HBD Sonu Sood | बर्थडेला सोनू सूदचे फॅन्सना गिफ्ट, 'फतेह'ला मिळाली रिलीज डेट

सोनू सूदने 'फतेह'ची रिलीजची डेट केली जाहीर
HBD Sonu Sood
सोनू सूदच्या फतेह चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहेInstagram
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता सोनू सूदने त्याच्या वाढदिवशी नवीन BTS फोटो पोस्ट करून दिली खास बातमी दिली. त्याच्या वाढदिवशी फतेहच्या रिलीजची तारीख समोर आली आहे. 10 जानेवारी 2025 ला होणार चित्रपट रिलीज होणार आहे. सोनू सूद आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसाचं औचित्य साधून त्याने त्याच्या सोशल मीडियावर बहुप्रतिक्षित चित्रपट 'फतेह' च्या रिलीजच्या तारखेची घोषणा केली आहे.

HBD Sonu Sood
Bigg Boss Marathi Day 2 : सूरज चव्हाणची एंट्री झाल्यानंतर म्हणतो,"माझं डोकं पिकायला लागलंय''
Summary

सोनू सूदचे दिग्दर्शनात पदार्पण

फतेह हा चित्रपट एक सायबर क्राइम थ्रिलर असणार आहे. या सिनेमातून सोनू सूद दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. नवीन पोस्टर आणि काही खास BTS फोटो पोस्ट करून ही घोषणा करण्यात आली आहे. फतेह 10 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून चित्रपटाविषयीची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करताना सूद यांनी या बद्दल ची उत्सुकता व्यक्त केली आहे.

सोनू सूदवर शुभेच्छांचा वर्षाव

सूदने पोस्ट टाकताच त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देऊन कौतुकाचा वर्षाव केला. तो म्हणाला, ही कथा "महत्त्वपूर्ण" आहे आणि सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आहे. शक्ती सागर प्रॉडक्शन आणि झी स्टुडिओज निर्मित, 'फतेह' मध्ये सूद नसीरुद्दीन शाह आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

HBD Sonu Sood
Bigg Boss Marathi Day 2 : घरात रोमँटिक वातावरण तयार झाले अन् निक्की..

सायबर क्राईमवर आधारित येणार चित्रपट

सोनू सूदचे दिग्दर्शक म्हणून पदार्पण करणारा ‘फतेह’ सायबर क्राईमच्या वास्तविक जीवनातील घटनांवर आधारित आहे. झी स्टुडिओज आणि शक्ती सागर प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली हा चित्रपट भेटीला येणार आहे.

HBD Sonu Sood
Nikki Tamboli ने Bigg Boss Marathi 5 मध्ये दाखवल्या दिलखेच अदा (Video)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news