

अभिनेता Vijay Deverakonda याचा भाऊ Anand Deverakonda सध्या चर्चेत आहे. रश्मिकाच्या स्वागतासाठी आनंदने केलेल्या खास कृतीमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. आनंद स्वतः टॉलीवूडमधील अभिनेता असून त्याने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. विजय आणि आनंद यांच्यातील सख्ख्या भावाचे नाते, त्यांचे एकमेकांना दिलेले पाठबळ आणि कुटुंबीयांमधील जिव्हाळा चाहत्यांना नेहमीच आवडतो.
who is Vijay Deverakonda Brother Anand Deverakonda welcome to rashmika
टॉलीवूडचा सुपरस्टार bfकायमच चर्चेत असतो, पण यावेळी त्याचा भाऊ Anand Deverakonda सोशल मीडियावर विशेष लक्ष वेधून घेत आहे. अलीकडेच रश्मिकाच्या स्वागतासाठी आनंदने केलेली खास कृती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळे चाहत्यांनी आनंदच्या साधेपणाचे आणि प्रेमळ स्वभावाचे कौतुक केले आहे.
आनंद देवरकोंडा हा स्वतः टॉलीवूडमधील अभिनेता आहे. त्याने ‘Dorasaani’, ‘Middle Class Melodies’ आणि ‘Baby’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनय क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्याने मेहनत घेतली आहे. मोठा भाऊ विजयप्रमाणेच आनंदलाही अभिनयाची आवड असून तो आपल्या निवडक भूमिकांमुळे ओळखला जातो.
विजय देवरकोंडा -रश्मिका मंदाना विवाह बंधनात अडकल्यानंतर आनंद देवरकोंडाने त्यांचे फोटो त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. आनंदने रश्मिका-विजय सोबतचा आपला फोटो शेअर करत लिहिलंय-
''असे अनेक वेळा होते जेव्हा चाहते ओरडायचे, ‘वादिना, एला उनारू?’ आणि मला कधीच कळले नाही की कशी प्रतिक्रिया द्यावी. आज, माझ्या भावाचे लग्न झाले आहे , आणि मला माझ्या वादिनासारखी सर्वात सकारात्मक आणि दयाळू व्यक्ती मिळाली आहे. मी प्रार्थना करतो की आयुष्यभर ते असेच हसत राहावे. आयुष्यभर एकत्र राहण्यासाठी!''
त्याने या कॅप्शनपुढे हार्ट इमोजी आणि एविल आय इमोजी शेअर केला आहे. वदिनाचा अर्थ वहिनी असा होतो. त्याने त्याची वहिनी (वादिना) रश्मिकाचे अशा प्रकारे स्वागत केले.
आनंद देवरकोंडाची ही इमोशन पोस्ट सध्य़ा व्हायरल होत आहे. 'वदिना' हा तेलुगुमध्ये वहिनी साठी वापरला जाणाराशब्द आहे. आनंदने नव्या जोडप्याचे काही फोटो देखील शेअर केले आहेत.
दोघांचे लग्न २६ फेब्रुवारी, २०२६ रोजी उदयपूरमधील एका आलीशान रिसॉर्टमध्ये झालं. होतं. यावेळी विजयने रेशमी धोती आणि अंग-वस्त्रम परिधान केले होते तर रश्मिकाने कांजीवरम साडी नेसली होती.