film Spirit Aishwarya Desai |'गली बॉय'ची अभिनेत्री संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट'मध्ये, विवेक ओबेरॉयचे डॅशिंग कमबॅक!

film Spirit Aishwarya Desai | 'गली बॉय'ची अभिनेत्री संदीप रेड्डी वांगाच्या स्पिरिटमध्ये, विवेक ओबेरॉयचे डॅशिंग कमबॅक!
vivek oberoi- Aishwarya Desai
film Spirit new poster out instagram
Published on
Updated on
Summary

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘स्पिरिट’च्या नव्या पोस्टरमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉयचा दमदार अवतार दिसतो. ऐश्वर्या देसाईचा देखील लूक व्पहायरल झाला आहे.

Aishwarya Desai Actress of Sandeep Reddy-Prabhas film 'Spirit

'स्पिरिट' चित्रपटाच्या टीमने नुकतेच संदीप रेड्डी वांगाचा चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये विवेक ओबेरॉयचा फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. प्रभास आणि तृप्ती डिमरी स्टारर या चित्रपटात दुसरी अभिनेत्री आहे-ऐश्वर्या देसाई, जी महत्त्वाच्या भूमिकेत आहे. प्रभास एक कॉपच्या भूमिकेत असेल. स्पिरिट चित्रपट ५ मार्च, २०२७ रोजी रिलीज होणार आहे.

कोण आहे ऐश्वर्या देसाई?

ऐश्वर्या देसाई एक इंडियन-अमेरिकन अभिनेत्री आहे. तिने इन्स्टाग्राम बायोवर दिलेल्या माहितीनुसार, मॉडल आणि कंटेंट क्रिएटर आहे. ती ब्युटी आणि लाईफस्टाईल कंटेंट बनवते. याआधी ती रणवीर सिंहचा चित्रपट 'गली बॉय'मध्ये छोट्याशा भूमिकेत दिसली होती. शॉर्ट थ्रिलर चित्रपट 'रॅट इन द किचन'सह अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली.

vivek oberoi- Aishwarya Desai
Thalapathy Vijay divorce case | थलपति विजयच्या पत्नीचा घटस्फोटासाठी अर्ज दाखल, विवाहबाह्य संबंधाचा आरोप?

आता तिला संदीप रेड्डी वांगा चा मोठा चित्रपट स्पिरिट मिळाला आहे. तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर तिचे चाळीस हाजरहून अधिक फॉलोअर्स आहेत. रिपोर्टनुसार, ती मुंबईत राहते. जारी केलेल्या नव्या पोस्टरमध्ये ऐश्वर्या देसाई देखील दिसते. ती एका टेबल समोर बसलेली दिसते.

विवेक ओबेरॉयचे दमदार कमबॅक

विवेक ओबेरॉय एक क्राईम बॉसच्या भूमिकेत असेल. त्याने कॅज्युअल व्हाईट शर्ट, गॉगल्स घातले आहेत. त्याच्या ओठात सिगारेट दिसत आहे.

vivek oberoi- Aishwarya Desai
Who is Thalapthy Vijay Wife Sangeetha|सिनेस्टारवर जीव ओवाळणारी चाहतीच झाली पत्नी! थलपति विजयची पत्नी संगीता आहे तरी कोण?

त्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय - "अंधारात लपलेले एक रहस्य आणि सर्वात खोल रहस्ये लक्षात ठेवणारे डोळे. ५ मार्च २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news