Rashmika-Vijay gold wedding jewellery|बासिकम ते टेंपल ज्वेलरी बनवण्यासाठी इतके लागले महिने, या सोन्याच्या दागिन्यांची खासियत काय?

Rashmika-Vijay gold wedding jewellery | बासिकम ते टेंपल ज्वेलरी बनवण्यासाठी इतके लागले महिने, या सोन्याच्या दागिन्यांची खासियत काय?
Rashmika-Vijay
Rashmika-Vijay gold wedding jewellery details instagram
Published on
Updated on
Summary

दाक्षिणात्य पद्धतीच्या लग्नात सोन्याच्या दागिन्यांना विशेष महत्त्व असते. अभिनेत्री Rashmika Mandanna आणि अभिनेता Vijay Deverakonda यांच्या वेडिंग लूकमध्ये पारंपरिक बासिकम आणि भव्य टेंपल ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधले. या दागिन्यांची डिझाइन तयार करण्यासाठी आणि हाताने कोरीव काम करण्यासाठी अनेक महिने लागल्याची माहिती समोर आली आहे. पारंपरिक दक्षिण भारतीय संस्कृतीचे प्रतीक असलेली ही ज्वेलरी केवळ सौंदर्यच नव्हे तर धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वही दर्शवते.

Rashmika-Vijay gold wedding jewellery making period details

दाक्षिणात्य लग्नसोहळ्यांमध्ये सोन्याच्या दागिन्यांना अत्यंत महत्त्व दिले जाते. अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चेमध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते त्यांच्या भव्य आणि पारंपरिक सोन्याच्या दागिन्यांनी. विशेषतः बासिकम आणि टेंपल साऊथ इंडियन ज्वेलरी यांची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरात सुरू आहे.

Rashmika-Vijay
Who is Thalapthy Vijay Wife Sangeetha|सिनेस्टारवर जीव ओवाळणारी चाहतीच झाली पत्नी! थलपति विजयची पत्नी संगीता आहे तरी कोण?

दक्षिण भारतीय विवाहसोहळ्यात सोन्याचे दागिने हे केवळ शोभेचे साधन नसून ते कुटुंबाच्या परंपरेचे आणि संपन्नतेचे प्रतीक असतात. त्यामुळे अशा ज्वेलरीची निवड करताना विशेष काळजी घेतली जाते. रश्मिका-विजयच्या लूकमध्येही पारंपरिकता आणि रॉयल्टी यांचा संगम दिसून आला, ज्यामुळे चाहत्यांनी त्यांच्या दागिन्यांचे फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले.

या दागिन्याची डिझाइन तयार करण्यासाठी अनुभवी कारागिरांनी सुमारे १० महिने मेहनत घेतल्याची माहिती मिळते. त्यावर केलेले कोरीव काम, सोन्याची शुद्धता आणि त्यातील नाजूक नक्षीकाम हे त्याचे वैशिष्ट्य आहे. रश्मिकाने एकूण ११ प्रकारचे सोन्याचे दागिने तर विजयने ८ प्रकारचे दागिने घातले होते. हैदराबादमधील एका प्रसिद्ध ज्वेलर्सने ते दहा महिन्यात बनवले होते. रश्मिकाने टेम्पल ज्वेलरी घातली होती.

Rashmika-Vijay
film Spirit Aishwarya Desai |'गली बॉय'ची अभिनेत्री संदीप रेड्डी वांगाच्या 'स्पिरिट'मध्ये, विवेक ओबेरॉयचे डॅशिंग कमबॅक!

कोणकोणत्या प्रकारचे दागिने होते?

बारीक नक्षीकाम आणि मास्टर कारागिरांनी हाताने बनवलेल्या दागिन्यांमध्ये पारंपारिक हराम (एक पारंपारिक दक्षिण भारतीय लांब हार), बासिकम (कपाळावरचे अलंकार), स्टेटमेंट झुमके (कानातले), जडा बिल्ला (केसांच्या वेणीमध्ये घातले जाणारे), चंपासरलू (कानाच्या साखळ्या), हातफूल (हाताच्या साखळ्या), माथापट्टी (कपाळावर बांधलेले अलंकार), नाकाची पिन, बांगड्या, बाजुबंद (बाहुला), कमरेचा पट्टा आणि पायल (पैंजण) यांचा समावेश होता, जे अँटीक मॅट पॉलिशमध्ये फिनिश केलेले होते.

तर विजयच्या दागिन्यांमध्ये हत्ती आणि वाघ सारखे डिझाईन असणाऱ्या दागिन्यांमध्ये कफ, झुमके, हार आणि एक ओडियनम बेल्ट होता. दक्षिण भारतीय वास्तुकलाच्या आकृतिबंधांच्या शिल्पकलेतून प्रेरणा घेऊन हे दागिने तयार करण्यात आले होते.

रिपोर्टनुसार, विजय आणि रश्मिका दोघांनीही ट्रेंडिग दागिने बाजूला ठेवून कौटुरियर अनामिका खन्ना यांनी डिझाईन केलेल्या त्यांच्या पारंपरिक लग्नाच्या पोशाखांना स्टाईल करण्यासाठी जड सोन्याचे दागिने निवडले होते.

बासिकमची खासियत आणि महत्व

बासिकम हा दक्षिण भारतातील पारंपरिक कपाळावर घालायचा दागिना असतो. हा पवित्रता आणि नवीन सुरुवातीचे शुभसंकेताचे प्रतीक मानला जातो. तेलुगु लग्नामध्ये कपाळावर बांधल्या जाणाऱ्या अलंकाराला बासिकम म्हटले जाते. बासिकम सहसा सोन्याची पाने, फुले, मोतीपासून बनवले जाते. हा वधूच्या टेंपल ज्वेलरीचा एक भाग असतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news