Akshay Kumar Bhooth Bangla First Song: अक्षय कुमारचा स्वॅगचं न्यारा, ‘भूतबंगला’मधील भन्नाट अंदाज

Akshay Kumar Bhooth Bangla First Song: अक्षय कुमारचा स्वॅगचं न्यारा, ‘भूतबंगला’मधील भन्नाट अंदाज
akshay kumar
Akshay Kumar Bhooth Bangla First Song teaser instagram
Published on
Updated on
Summary

‘भूतबंगला’मधील पहिल्या गाण्यात अक्षय कुमारचा जबरदस्त स्वॅग आणि भन्नाट अंदाज पाहायला मिळत आहे. गाणं रिलीज होताच सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली असून चाहत्यांनी त्याच्या एनर्जी आणि स्टाइलचं कौतुक केलं आहे. हॉरर आणि कॉमेडीचा संगम असलेल्या या चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे.

Akshay Kumar Bhooth Bangla First Song out tomorrow

भूत बंगला २०२६ चा चर्चित चित्रपट असून उद्या रिलीज होणाऱ्या गाण्याचा आज टीझर रिलीज करण्यात आला आहे. तब्बल १४ वर्षांनंतर अक्षय कुमार आणि प्रियदर्शन यांची जोडी पुन्हा एकत्र काम करत आहे. निर्मात्यांनी पहिले गाणे ‘रामजी आके भला करेंगे’चा टीजर रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये अक्षय आपल्या जुन्या कॉमिक अंदाजात दिसत आहे.

यापुर्वी अक्षयचा 'जॉली एलएलबी ३' हिट ठरला होता. पुन्हा एकदा हॉरर-कॉमेडी अवतारात तो फॅन्सचे मनोरंजन करायला तयार आहे.

akshay kumar
Rashmika Vijay Wedding: रश्मिका-विजयचे तेलुगु-कोडवा रितीरिवाजाने लग्न? ग्रँड रिसेप्शन यादिवशी, स्पेशल गेस्टदेखील ठरले

मंगळवारी 'भूतबंगला'चे पहिले गाणे 'राम जी भला करेंगे'चे फर्स्ट लूक पोस्टर अक्षय कुमारने सोशल मीडियावर शेअर केलं होतं. आता या गाण्याचे टीजर देखील अक्कीने आपल्या अधिकृत एक्स हँडलवर शेअर करण्यात आले आहे. राम जी भला करेंगेच्या टीजरमध्ये अक्षय भूतांच्या टोळीसोबत मस्ती करताना दिसत आहे.

akshay kumar
Tara Sutaria New Home | एक नवी सुरुवात..तारा सुतारियाच्या स्वप्नातलं घर, शेअर केली इंटिरिअर झलक

'राम जी आकर भला करेंगे' संपूर्ण गाणे उद्या रिलीज होणार आहे. अक्षयने ही माहिती सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर दिलीय. त्याने लिहिलं , 'मी आपल्या भूतांसोबत तयार आहे, आणि तुम्ही आहात? 'राम जी आकर भला करेंगे'चे टीजर जारी. गाणे उद्या येईल!'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news