Rashmika Vijay Wedding: रश्मिका-विजयचे तेलुगु-कोडवा रितीरिवाजाने लग्न? ग्रँड रिसेप्शन यादिवशी, स्पेशल गेस्टदेखील ठरले

Rashmika Vijay Wedding: रश्मिका-विजयचे तेलुगु-कोडवा रितीरिवाजाने लग्न? ग्रँड रिसेप्शन यादिवशी, स्पेशल गेस्टदेखील ठरले
Rashmika Vijay
Rashmika Vijay Wedding updates instagram
Published on
Updated on
Summary

दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी Rashmika Mandanna आणि Vijay Deverakonda यांच्या लग्नाच्या चर्चांनी सोशल मीडियावर जोर धरला आहे. तेलुगु आणि कोडवा परंपरेनुसार विवाहसोहळा पार पडणार असल्याची चर्चा आहे. ग्रँड रिसेप्शनची तारीख आणि स्पेशल गेस्ट लिस्टबाबतही विविध अंदाज व्यक्त केले जात असून अधिकृत घोषणेची सर्वांना प्रतीक्षा आहे.

Rashmika Mandanna Vijay Deorkonda Wedding

विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या लग्नाची तयारी सुरू झालीय. उदयपूरमध्ये त्यांचे डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे. हे संपूर्णपणे खासगी ठेवण्यात आले आहे. प्री-वेडिंग सेलिब्रेशनचे काही झलक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. दरम्यान, हे लग्न दोन वेगवेगळ्या रितीरिवाजाने होणार असल्याचे समजते.

दोघे २६ फेब्रुवारी रोजी उदयपूरमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत. सकाळी तेलुगू रितीरिवाजानुसार तर सायंकाळी कोडावा परंपरेनुसार लग्न होईल. कोडावा ही रश्मिकाच्या परिवाराची परंपरा आहे. केवळ परिवाराचे लोक आणि जवळचे मित्र सहभागी होतील.

Rashmika Vijay
Splitsvilla 7 fame Mayank Pawar dies | स्प्लिट्सव्हिला ७ फेम मयंक पवारचे निधन

रश्मिकाच्या सासूकडून गिफ्ट

रश्मिकाला तिच्या सासूने बांगड्या गिफ्ट केल्या आहेत. यावेळी दोन्ही कुटुंबीय एकत्र दिसले. दुसरीकडे लग्नात स्टार्स दिसणार नाहीत. परंतु, ४ मार्चला हैदराबादमधील एक ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. या रिसेप्शनमध्ये अनेक दिग्गज, बॉलिवूड, साऊथ स्टार्सना आमंत्रित करण्यात आलं आहे.

काय आहे कोडवा रितीरिवाज?

Kodava (कोडवा) समाजाचे लग्न हे परंपरा, शौर्य आणि सांस्कृतिक अभिमान यांचे सुंदर मिश्रण असते. Kodagu (कूर्ग) जिल्ह्यात प्रामुख्याने आढळणाऱ्या या समाजात लग्नसमारंभात पारंपरिक पोशाख, तलवार धारण करणे, विशेष विधी आणि नृत्य यांना महत्त्व दिले जाते. साधेपणा, कुटुंबकेंद्रित पद्धती आणि निसर्गाशी जवळीक ही कोडवा विवाहाची वैशिष्ट्ये मानली जातात.

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांची लव्हस्टोरी २०१८ मध्ये तेलुगु चित्रपट 'गीता गोविंदम' मधून सुरु झाली. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीमुळे सुरुवातीच्या काळात डेटिंगच्या अफवा पसरल्या होत्या. पुढे 'डियर कॉम्रेड'मध्ये ते पुन्हा एकत्र दिसले. दोघांनीही आपले रिलेशन सार्वजनिक केले नव्हते. असे असले तरी दोघांचे फॅन्स ते डेटिंग करत असल्याचे अंदाज बांधत होते.

Rashmika Vijay
Tara Sutaria New Home | एक नवी सुरुवात..तारा सुतारियाच्या स्वप्नातलं घर, शेअर केली इंटिरिअर झलक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news