Phone Bhoot OTT Release Date: ‘फोन भूत’, ‘राम सेतू’ ओटीटीवर कुठे पहाल?

ramsetu
ramsetu
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कॅटरीना कैफ, ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदीचा हॉरर कॉमेडी चित्रपट फोन भूत आता ओटीटी प्लॅटफॉर्म  प्राईम व्हिडिओवर पोहोचला आहे. (Phone Bhoot OTT Release Date) पण, सध्या त्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. याआधी अजय देवगनची थँक गॉड आणि अक्षय कुमारचा राम सेतु स्ट्रीम झाला आहे. बुधवारी, प्राईम व्हिडिओने याबाबतची माहिती दिली. 'फोन भूत' हा गुरमीत सिंह यांनी दिग्दर्शित केला आहे. ४ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात हा रिलीज झाला होता. निर्मिती फरहान अख्तरच्या कंपनीने केला  आहे. (Phone Bhoot OTT Release Date)

भूत पकडणाऱ्यांची कहाणी

मेजर आणि गुल्लू बेरोजगार युवक आहेत, जे भूत पकडण्याचं काम करतात. कॅटरीना, भूतनी रागिनीच्या भूमिकेत आहे, जी त्यांची पार्टनर बनते. पण, त्यामागचा रागिनीचा उद्देश वेगळाच असतो. या चित्रपटामध्ये जॅकी श्रॉफची मुख्य भूमिका आहे.

कॅटरीना कैफचे अन्य चित्रपट

विक्की कौशलशी लग्नानंतर कॅटरीना 'मेरी ख्रिसमस' आणि 'टायगर ३' येत आहे. मेरी ख्रिसमसचे दिग्दर्शन श्रीराम राघवन करत आहेत. या चित्रपटामध्ये विजय सेतुपती मुख्य भूमिकेत असेल. तर तिचा 'टायगर ३' मनीष शर्माच्या दिग्दर्शनाखाली बनणार आहे.

अक्षय कुमारचा राम सेतु

थँक गॉड नंतर राम सेतू आता २३ डिसेंबर रोजी फ्री स्ट्रीमिंग २३ डिसेंबर सुरू होईल. अक्षयने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिलीय. प्राईम व्हिडिओवर चित्रपट हिंदीसोबत तमिळ, तेलुगुमध्येदेखील उपलब्ध आहे. अभिषेक शर्मा दिगेदर्शित राम सेतु दिवाळीला रिलीज झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news