औरंगाबाद : दोन दुचाकींची धडकेत तरुणाचा मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : दोन दुचाकींची धडकेत तरुणाचा मृत्यू

हतनूर, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबाद- धुळे राष्ट्रीय महामार्गावरील हतनूर नजीक दोन दुचाकींच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात मंगळवारी (दि.२०) रात्री घडला.  सोहेल कदीर शेख (वय २४, रा.हतनूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोहेल शेख हा मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून हतनूरकडून कन्नडकडे जात असताना समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलने जोरदार घडक दिली. या धडकेत सोहेलच्या डोक्याला दुखापत झाली. अपघाताची माहिती समजताच चालक हर्षवर्धन काळे, पोलीस मित्र संतोष ढोले आदींसह ग्रामस्थ युवकांनी दोन्ही जखमींना उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेतून हतनूर प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

आरोग्य केंद्रात कुणीही नसल्याने चालकाने गंभीर रुग्णांना सोडून पळ काढला. खासगी वाहनचालकाने  जखमी रुग्णांना १०८ रुग्णवाहिकेत औरंगाबादला नेले. उपचार सुरू असताना जखमी सोहेल याचा बुधवारी (दि.२१) मृत्यू झाला. घटनेची कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सहायक फौजदार सतिश खोसरे तपास करीत आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button