पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचे नाव जगातील 'ऑल टाईम ५०' महान अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. मंगळवारी ( दि. २०)युरोपियन मॅगजीन एम्पायरने (Sharukh Khan) जगभरातील महान अभिनेत्यांची यादी जाहीर केली. यामध्ये 'किंग खान'चं नाव या यादीत सहभागी होणारा एकमेव भारतीय ठरला आहे. शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली. या यादीमध्ये शाहरुखसोबत 'रॉबर्ट डी नीरो', 'टॉम क्रूज', 'नताली पोर्टमॅन', 'बेटे डेविस' आणि 'डेनजेल' यासारख्या दिग्गज कलाकारांच्या नावांचा समावेश आहे. (Sharukh Khan)
शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिने पोस्टमध्ये म्हटलं आहे की, "शाहरुखचं नाव 'एम्पायर मॅगॅझीन'साठी ५० महान कलाकारांच्या यादीत समाविष्ट करण्यात आलं आहे. शाहरुख हा सन्मान मिळवणारा पहिल्या भारतीय आहे. त्यांच्यामुळे नेहमी आम्हाला अभिमान वाटतो."
मॅगझीनच्या यादीमध्ये शाहरुखच्या ज्या भूमिकेंचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामध्ये देवदास मुखर्जी (देवदास), रिजवान खान (माय नेम इज खान), राहुल खन्ना (कुछ कुछ होता है) आणि मोहन भार्गव (स्वदेश) चित्रपटातील भूमिकांचा समावेश आहे.
जवळपास ४ वर्षांनंतर 'पठान'मध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत दिसेल. याआधी त्याने 'झिरो'मध्ये काम केलं होतं. २०२३ मध्ये 'किंग खान'चे तीन मोठे चित्रपट रिलीज होतील. २५ जानेवारीला 'पठाण', २ जूनला 'जवान' आणि वर्षांच्या शेवटी 'डंकी' रिलीज होईल.
भारतीय चित्रपटांना ग्लोबल स्पेसवरदेखील सन्मानित केलं जातं आहे. एस एस राजामौलीचा चित्रपट RRR ला जगभरात ओळख मिळाली. साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चित्रपट 'पुष्पा द राईज'ला रशियामध्ये प्रेक्षकांकडून प्रेम मिळालं. 'RRR' आणि 'गंगूबाई काठियावाडी' 'बेस्ट फिल्म ऑफ द ईयर'च्या लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आलं. इतकंच नव्हे तर भारतीय प्रेक्षकांना 'ऑस्कर'मध्येही 'RRR' कडून अपेक्षा आहेत.
हेही वाचा :