

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा पठाण चित्रपटावरुन वाद वाढतचं चालला आहे. पठान (Pathan Controversy) या चित्रपटातील गाणे बेशर्म रंग या गाण्यावरून आणि या गाण्यामधील कपड्यांवरून मोठा वाद निर्माण झालाय. या गाण्यात मुख्य अभिनेत्री दीपिका पादुकोन हिने भगव्या रंगाची बिकिनी परिधान केलीय. शिवाय या गाण्यात खूप मादक अदा चित्रीत करण्यात आल्या आहेत. यावरून अनेकांनी शाहरुखचा हा चित्रपट बायकॉट करण्याची मागणी केलीय. मंत्री नरोत्तम मिश्रा, बिहारचे मंत्री हरि भूषण ठाकूर यांनी हा चित्रपट रिलीज होऊ देणार नाही असे म्हटले आहे. आता शाहरुखला थेट जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. (Pathan Controversy)
जगत गुरु परमहंस आचार्य म्हणाले, चित्रपट पठाणमध्ये भगव्याचा अपमान केला आहे. हे एक रचलेले षड्यंत्र आहे. याअंतर्गत हिंदुंच्या भावना दुखावण्याचा लोकांनी धंदा बनवला आहे. हा चित्रपट एक जिहाद आहे. ही रणनीती तयार केली जातेय. यासाठी आम्ही शाहरुख खानचे पोस्टर जाळलं आहे. मी त्याला शोधत आहे. जेव्हा तो सापडेल… भगवा शांतीचं प्रतीक आहे आणि सर्व सनातन धर्म मानणाऱ्यांची आन बान शान आहे. भगव्या रंगाचा अपमान सहन केला जाणार नाही.
जगतगुरु परमहंस आचार्य म्हणाले की, आमची माणसं मुंबईमध्ये त्याला शोधत आहेत. ज्या दिवशी शाहरुख खान सापडेल…कुणी जर सनातनचा अपमान करेल तर पलटवार होईल….
आचार्य म्हणाले की, त्यांना माहिती आहे की, हिंदू मानवतावादी आहे. त्याची काही लोकांकडून खिल्ली उडवली जाते आणि पैसे कमावले जातात. परंतु, जे सनातनच्या आस्थेची चेष्टा करतील आणि अपमान करेल, त्यावर पलटवार होईल. त्याचसोबत आमचे प्रभू श्री राम, भगवान श्री कृष्ण, भगवान शंकर आणि श्री बजरंगबली हनुमान यांनीदेखील राक्षसांचा वध केला आहे…
हेही वाचा :