Dhurandhar 2 is propaganda? 'सिनेमा प्रपोगंडावर राजकारण करणाऱ्यांनो..' धुरंधर-२च्या 'रिझवान'ने ट्रोलर्सची बोलती केली बंद!

mustafa ahmed on Dhurandhar 2 cinema propaganda or not? - 'सिनेमा प्रपोगंडावरवर राजकारण करणाऱ्यांनो..' धुरंधर-२च्या 'रिझवान'ने ट्रोलर्सची बोलती केली बंद!
mustafa ahmed
Dhurandhar 2 cinema is propoganda or not pudhari photo
Published on
Updated on

mustafa ahmed on Dhurandhar 2 cinema propaganda or not?

धुरंधर 2 फेम रिझवान अर्थातच अभिनेता मुस्तफा अहमदने या सिनेमावरील प्रोपगंडा लेबलवर टीका केली. तो म्हणाला की, आदित्य धर मुकेश वा महेशला कास्ट करू शकले असते. या भूमिकेसाठी त्यांनी आपल्या मूल्यांशी कुठलीही तडजोड केली नाही, असे म्हणत मुस्तफाने आदित्य धरचे समर्थन केले.

या सिनेमाला प्रोपगंडा म्हटले जात असल्याबद्दल मुस्तफा म्हणाला, "एका माणसाचा प्रचार, दुसऱ्या माणसाचा अजेंडा असतो. माझं नाव मुस्तफा अहमद आहे. आदित्य जी कुठल्याही प्रचारासाठी हे करत असते तर ते एखाद्या मुकेश किंवा महेशला घेतलं असतं. आदित्य धर यांना माझ्यासोबत काम करण्याची काय गरज होती? कुणी कुणासाठी इतकं का करेल. मी सर्वांचा आदर करतो.''

''मी कुठेही जातो, लोक म्हणतात की मी प्रसिद्धीसाठी किंवा कशासाठी तरी माझी सद्सद्विवेकबुद्धी विकली आहे, पण मी असे काहीही केले नाही. मी फक्त माझ्यासाठी बोलू शकतो, माझ्या स्वत: च्या मार्गाने, आणि माझ्या स्वत: च्या आवडीनुसार काम करतो. मी या पात्रासाठी चुकीचे काही केलेले नाही.''

कोण आहे मुस्तफा अहमद?

मुस्तफा अहमदने धुरंधर २ मध्ये रणवीर सिंह सोबतकाम केले आहे. मुस्तफाचे बालपण सोपे नव्हते. त्याला डिस्लेक्सियामुळे आपले शिक्षण सोडावे लागले होते. २००१ मध्ये त्याने एका कॉल सेंटरमध्ये काम केले. तेथे त्याला महिन्याला एक लाख रुपये मिळायचे. पण, दुसरीकडे फिटनेसकडे त्याने लक्ष दिले. यातून तो दिवसाला १४ सत्रे घेत महिन्याला १.४ लाखांपेक्षा जास्त कमाई करू लागला. हळूहळू, त्याने फिटनेस उद्योगात स्वत:ला झोकून दिले.

mustafa ahmed
Operation Sindoor |पाकिस्तानला पुन्हा धूळ चारणार! विवेक अग्निहोत्री-भूषण कुमार आणताहेत 'ऑपरेशन सिंदूर', लष्कराच्या शौर्याची सत्य कथा!

हृतिक रोशनला दिले ट्रेनिंग

मुस्तफाला मोठी संधी मिळाली ती म्हणजे, अभिनेता हृतिक रोशनसाठी फिटनेस ट्रेनिंग. त्याने या उद्योगात आपले वर्चस्व निर्माण करत उत्तम फिटनेस ट्रेनर्सपैकी एक बनला. दिग्दर्शक आदित्य धरने त्याला अभिनेता बनण्याची संधी दिली. मुस्तफा स्वतः म्हणाला की, आदित्य धरने त्याच्यामध्ये एक अशी प्रतिभा पाहिली होती, जी त्याने स्वतः ओळखली नव्हती. पहिल्यांदा कॅमेरासमोर आल्यानंतर खूप घाबरल्याचेही तो सांगतो. पण त्याने स्वतःवर विश्वास ठेवला आणि आज त्याच्या अभिनयाची चर्चा सुरु आहे. मुस्तफाने याआधी रणवीर सिंग, यामी गौतम यांचा फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम केलं आहे.

mustafa ahmed
Dhurandhar 2 | रणवीर सिंगने पगडी घालून ओढली सिगारेट? 'धुरंधर २'च्या व्हायरल फोटोवर दिग्दर्शक आदित्य धर भडकला!

धुरंधरबाबत आमीर खान म्हणाला...

दरम्यान, दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलताना अभिनेता आमीर खान म्हणाला-"मी अद्याप चित्रपट पाहिला नाही, परंतु मी फक्त चित्रपटाची प्रशंसा ऐकतो. धुरंधर १ आणि आता धुरंधर २ दोन्ही चित्रपटांनी चांगला व्यवसाय केला आहे, आणि माझ्या टीमला खूप खूप शुभेच्छा."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news