

रजनीकांतचा कुली सिनेमा आज रिलीज झाला आहे. या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच अनेक रेकॉर्ड स्वतच्या नावावर केले आहेत. कुली हा रजनीकांतचा 171 वा सिनेमा आहे. रजनीच्या इतर सिनेमांप्रमाणेच या सिनेमानेही चांगलीच हाइप बनवली आहे. या सिनेमात अनेक कलाकारांचा कॅमियो आहे. (Latest Entertainment News)
त्यापैकी चर्चेत आहे तो सुपरस्टार आमीर खान. आमीरचाही या सिनेमात कॅमियो आहे. या सिनेमात दिसणारा तो एकमेव बॉलीवुड कलाकार आहे. अर्थात आमीरने या सिनेमात त्याच्या लूक्स आणि अभिनयाची जादू चालवली आहे. या सिनेमात आमीरचा नेहमीपेक्षा हटके स्वॅग दिसतो आहे.
मल्टीस्टारर कुली मोठ्या पडद्यावर रिलीज झाला आहे. 2025 मधील बहूप्रतीक्षित सिनेमा म्हणून याकडे पाहता येईल. या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येच मोठा गल्ला जमावला आहे.
लोकेश कनगराज दिग्दर्शित या सिनेमात आमीरचा स्क्रीन प्रेझेंस जवळपास 10 मिनिटांचा आहे. दाहा असे त्याच्या व्यक्तिरेखेचे नाव आहे. आमीर अशा व्यक्तीची व्यक्तिरेखा साकारतो आहे. जो रजनीकांतच्या शोधात आहे. त्याचा व्यक्तिरेखेची शेड काहीशी घाबरवणारी असली तरी तिला विनोदी छटाही आहे. अर्थातच आमीरच्या या अतरंगी व्यक्तिरेखेचे कौतुकही खूप होत आहे.
कुली या सिनेमातील अनेक कलाकारांचा कॅमियोही चर्चेत आहे. या सिनेमातून पाच सुपरस्टार्स कॅमियो करणार आहेत. या सिनेमात तामीळ सिनेसृष्टीमधून रजनीकांत, तेलुगू सिनेमातून नागार्जून, मल्याळम सिनेमातून सौबिन शाहीर, कन्नड सिनेमातून उपेंद्र या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात श्रुती हसन, नागार्जून, सत्याराज हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसत होते. सोन्याच्या तस्करीवर हा सिनेमा बेतलेला आहे.
या सिनेमाततील दहा मिनिटांच्या भूमिकेसाठी आमीरने 20 कोटी रुपये घेतल्याचे समोर येत होते. पण आमीरच्या कुली टीमवरील प्रेमामुळे या सिनेमासाठी कोणतीच फि आकारली नाही.