

पहिला वहिला भारतीय सुपरहीरो शक्तिमानवर सिनेमा कधी येणार याची वाट चाहते आतुरतेने पाहात आहेत. पण आता या गोष्टीत एक ट्विस्ट आला आहे. या सिनेमात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे असे समजल्यावर मुकेश यांनी मालिकेचे राईट्स देण्यास साफ नकार दिला आहे. (Latest Entertainment News)
त्यांना समजवण्यासाठी रणवीर सिंग स्वत: त्यांच्या ऑफिसमध्ये गेला. त्यांचाशी 3 तास चर्चा करूनही यावर काहीच तोडगा निघाला नाही. आता तर मुकेश यांनी अगदीच ठाम ठरवले आहे की ते रणवीर सिंहला घेऊन शक्तिमान अजिबात बनवणार नाही. भले त्यांना कोर्टापर्यंत जावे लागले असते तरी चालले असते.
अलीकडेच दिलेल्या एका मुलाखती दरम्यान मुकेश यांना विचारले गेले की शक्तिमानवर सिनेमा कधी येणार? त्यावर बोलताना ते म्हणाले, ‘ याला उशीर झाला आहे मला माहिती आहे. अर्थात उशीर होणे हा माझा हट्ट होता. शक्तिमानवर सिनेमा दोन वर्षांपूर्वीच येणार होता. पण त्यात कोरोंनामध्ये आला. मला एक अगदी योग्य कास्टिंग हवे आहे. एका कलाकारावरुन हे अडकले आहे. मला अजून उत्तर आले नाही.
ते म्हणाले की, शक्तिमानच्या इंटेलेक्चुल प्रॉपर्टी राइटची मालकी अजून माझ्याकडेच आहे. मी करारात लिहिले होते सिनेमाचा आत्मा चेंज होणार नाही. पण हे लिहिले नव्हते की कलाकाराची निवड मला विचारून होईल. त्यांचे मत होते तुमच्याशी विचारविनीमर्ष करू पण शेवटचा निर्णय आमचाच असेल.’ मी त्यांना सांगितले रामाच्या भूमिकेत रावणासारख्या दिसणाऱ्याला घेऊ शकत नाही.
या भूमिकेच्या केंद्रस्थानी असणारा रणवीर मुकेश यांच्या भेटीला आला होता. त्याने कास्टिंगला परवानगी मिळावी म्हणून समजूत घातली. मुकेश याबाबत बोलताना म्हणाले, रणवीर आला होता. आमच्या गप्पा खूप उत्तम चालल्या. पण शक्तिमान म्हणून मी त्यांला पाहू शकत नाही. तो उत्तम अभिनेता आहे पण शक्तिमान बनण्यायोग्य नाही. त्यांनाही माहिती आहे मुकेश यांना बाजूला करून हा सिनेमा बनू शकत नाही. खरेतर माझे कोटीचे नुकसान होत आहे. पण मी सिद्धांतावर चालणारा माणूस आहे.