

अभिनेत्री शिल्पा शिरोडकर हिच्या गाडीला एका बसने धडक दिली आहे. सुदैवाने शिल्पाला या अपघातात कोणतीही इजा झाली नाही. पण बस कंपनीने या अपघाताची कोणतीही जबाबदारी घेतलेली नाही शिल्पाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Latest Entertainment News)
शिल्पाने इंस्टा पोस्ट करत याबाबत खुलासा केला आहे. यामध्ये तीने बस कंपनीवर हा आरोप केला आहे. यानंतर तीने मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली असून तीने यावेळी अपघातग्रस्त गाडीचे काही फोटोही शेयर केले आहेत. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये ती म्हणते, ‘आज सिटीफ्लोमध्ये एक बस माझ्या कारला धडकली. या बस कंपनीचे प्रतिनिधी मला सांगत आहेत की ही त्यांच्या कंपनीची नाही तर ड्रायव्हरची जबाबदारी आहे. हे लोक किती निर्दयी आहेत. त्या ड्रायव्हरचा असा पगारच किती असणार?’
यानंतर पुढे तीने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, मुंबई पोलिसांचे आभार. त्यांच्यामुळेच मी त्रासरहित तक्रार दाखल करू शकले. पण कंपनी कोणतीही जबाबदारी घेण्यास नकार देत आहे. सुदैवाने माझा स्टाफ ठीक आहे. या अपघातात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. पण काहीही होऊ शकले असते.
शिल्पाने 90च्या दशकात अभिनय करियरची सुरुवात केली. भ्रष्टाचार हा तिचा पहिला सिनेमा होता. या सिनेमात तिच्यासोबत मिथुन चक्रवर्ती आणि रेखा हे कलाकार होते. यानंतर शिल्पाने खुदा गवाह, आँखें, पहचान, गोपी किशन, बेवफा सनम, मृत्युदंड आणि गजगामिनी या सिनेमात काम केले. बराच काळ चंदेरी पडद्यापासून लांब राहिल्यानंतर तिने टेलिव्हिजन क्षेत्रात पाऊल ठेवले.
तिने बिग बॉस 18 मध्ये सहभाग घेतला होता. आता ती पहिल्या वाहिल्या वेब प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. शंकर- द रिवोल्यूशनरी मॅन असे ती काम करत असलेल्या बायोपिकचे नाव आहे. यात ती आद्य शंकराचार्यांच्या आईच्या भूमिकेत दिसणार आहे.