रजनीकांतने आपण बॉक्स ऑफिसचे थलयवा असल्याचे पुन्हा सिद्ध केले आहे. त्याच्या कुली या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वी जगभरात 50 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या सिनेमाने रिलीजच्या चार दिवस आधीपासूनच अॅडव्हान्स बुकिंगने नाव रेकॉर्ड बनवला आहे. लोकेश कनगराज यांच्या दिग्दर्शनात बनलेला हा सिनेमा सध्या चांगलाच चर्चेत आहे. (Latest Entertainment News)
सिनेमाच्या प्री सेल्स (अॅडव्हान्स बुकिंग) जेव्हा परदेशात सुरू झाले त्यावेळी त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळालेला दिसून आला. एका प्रसिद्ध वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार जगभरात बुकिंगचा आकडा 50 कोटी पार केला आहे. केवळ विदेशी बाजारातील कलेक्शन 41 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. हे कलेक्शन कमल हसनच्या ठग लाईफच्या एकूण विदेशी कलेक्शनपेक्षा तुलणेने जास्त आहे. यावरून कुलीच्या एकूणच प्रभावाची कल्पना येत आहे.
नॉर्थ अमेरिकेमध्ये कुलीला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. या सिनेमाच्या प्रीमियरच्या बुकिंगने आतापर्यंत 14 कोटी रुपये मिळवले आहेत. केवळ अमेरिकेमध्ये 1.45 मिलियन डॉलर कलेक्शन आहे. तर 56000 तिकिटे विकली गेली आहेत.
सिनेएक्स्पर्टसनुसार हा सिनेमा ओपनिंगलाच 70-80 कोटींची कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात होता. हा सिनेमा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि इंग्लिशमध्येही रिलीज केला जाणार आहे.
हा सिनेमा कमाईमुळे जसा चर्चेत आहे त्याचप्रमाणे तसंच या सिनेमातील अनेक कलाकारांचा कॅमियोही चर्चेत आहे. या सिनेमातून पाच सुपरस्टार्स कॅमियो करणार आहेत. या सिनेमात तामीळ सिनेसृष्टीमधून रजनीकांत, तेलुगू सिनेमातून नागार्जून, मल्याळम सिनेमातून सौबिन शाहीर, कन्नड सिनेमातून उपेंद्र आणि बॉलीवूडमधून आमीर खान या सिनेमात दिसणार आहे. विशेष म्हणजे या सिनेमातील कॅमियोसाठी आमीर खानने कोणतीही फी घेतली नसल्याचे समोर आले आहे.
रजनीकांतच्या कुलीचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरू असताना वॉरपेक्षा काहीसा सरसच ठरला आहे. वॉर 2 मध्ये ज्युनियर एनटीआर व्हिलनच्या भूमिकेत दिसणार आहे. तर मेजर कबीरच्या भूमिकेत हृतिक रोशनच्या भूमिकेत परत दिसणार आहे.
कुली हा रजनीकांतचा 171 वा सिनेमा आहे. या सिनेमात अभिनेत्री श्रुती हासन पण दिसणार आहे. या सिनेमाच्या तमिळ व्हर्जनने आतापर्यंत सर्वात जास्त कलेक्शन केले आहे. तर हिंदी व्हर्जनने 5 लाख रुपये मिळवले आहे.