Rajesh Pinjani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन | पुढारी

Rajesh Pinjani : राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

पुढारी ऑनलाईन

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट दिग्दर्शक राजेश पिंजाणी (Rajesh Pinjani ) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. पिंजाणी यांनी बाजू बॅंडबाजा या चित्रपटाच्या माध्यमातून सामान्य माणसाच्या जगण्यातलं दु:ख मांडलं होतं. या चित्रपटासाठी त्यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. राजेश पिंजाणी (Rajesh Pinjani ) मूळचे नागपूरचे होते. पण, सध्या पुण्यात राहत होते.त्यांच्या पार्थिवावर नागपूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

बाजू बॅंडबाजा चित्रपटातील बँडवाल्याची प्रमुख भूमिका अभिनेते मिलिंद शिंदे यांनी साकारली. मिताली जगताप-वराडकर, विवेक चाबूकस्वार यांच्याही प्रमुख भूमिका या चित्रपटात होत्या.

‘बाबू बँडबाजा’ या चित्रपटात  सर्वसामान्‍य माणसाच्‍या जगण्‍यातील संघर्षाचे वास्तवदर्शी चित्रण मांडण्यात आले हाेते. बँडवाल्यांचे जीवन हलाखीचे ठरले आहे. आजही बँडवाले हलाखीचे जीवन जगतात. त्यांचा रोजचाच संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आला होता. पाचवीला पुजलेले दारिद्र आणि ते सहन करत जगणारे आई-बाप, लहान मुलगा यांची कथा या चित्रपटात माडण्यात आली होती.

हेही वाचलं का? 

Back to top button