पुढारी ऑनलाईन डेस्क
इलेक्ट्रिक कार घेण्यासाठीची महाराष्ट्र राज्याची सवलत ३१ मार्च २०२२ पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. फोर व्हीलरमधील Tata Nexon EV आणि Tata Tigor EV या दोन कार या योजनेसाठी पात्र आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणानुसार बॅटरीच्या क्षमतेनुसार Early Bird स्कीम सुरू केली होती. 1 KWH साठी ५ हजार रुपये अशी ही सवलत आहे. ३० KWH इतक्या बॅटरी क्षमतेपर्यंत ही सवलत दिली जाते. ही योजना ३१ डिसेंबर २०२१ ला संपणार होती, पण सरकारने या योजनेला ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
याशिवाय इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्यासाठी केंद्र सरकारकडून दीड लाखांची सबसिडी दिली जाते. त्याचबरोबर राज्य सरकारच्या Early Bird स्कीममधील १ लाख पकडल्यास या दोन कार घेण्यासाठी २.५ लाखांची सवलत मिळवता येणार आहे.
Hyundai Kona, MG ZS EV, Jaguar I-Pace आणि Audi e-tron या कारमधील बॅटरची क्षमता जास्त असल्याने त्या या Early Bird Offer साठी पात्र ठरलेल्या नाहीत.
केंद्र सरकार FAME II योजनेच्या अंतर्गत सबसिडी देते. त्या सबसिडीवर राज्य सरकार Early Bird योजनेअंतर्गंत अधिकची सवलत देत असते.
हेही वाचा