‘इंडियन आयडल मराठी’ : पनवेलचा सागर म्हात्रेचा झिंगाट परफॉर्मन्स | पुढारी

'इंडियन आयडल मराठी' : पनवेलचा सागर म्हात्रेचा झिंगाट परफॉर्मन्स

पुढारी ऑनलाईन

सोनी मराठी वाहिनीवर सुरू झालेल्या ‘इंडियन आयडल मराठी’ या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढत जातेय. महाराष्ट्राला उत्तम १२ स्पर्धक मिळाले असून विजेतेपदासाठी त्यांच्यात आता काटे की टक्कर होताना दिसते आहे. कार्यक्रमाची निर्मिती आराधना भोला यांच्या फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. ही संस्था करत असून अजय-अतुल ही लोकप्रिय जोडी परीक्षण करते आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून निवडलेल्या या स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे पनवेलचा सागर म्हात्रे.

पेशाने इंजिनियर असणारा हा तरुण त्याच्या गोड गळ्याने रसिकांच्या मनाचा ठाव घेतो आहे. ह्या आठवड्यात त्याच्या सादरीकरणाला परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्स मिळाला आहे.

सागरला बाइक्स मॉडिफाय करण्याची आवड आहे. तो इंजिनियर असला, तरी त्याच्या संगीतावरच्या प्रेमाने, श्रद्धेने आणि उत्तम रियाजाने तो हळूहळू स्पर्धेचा टप्पा पार करतो आहे. सलग तीन आठवडे सुरेल सादरीकरण करून सागरने परीक्षकांकडून झिंगाट परफॉर्मन्सची हॅट्ट्रिक मिळवली आहे. एवढंच नाही तर त्याच्या ‘रमता जोगी’ या गाण्याला परीक्षकांकडून स्टँडिंग ओव्हेशनसुद्धा मिळालं.

सांगा मुकुंद कुणी हा पहिला, दिल कि तपीश, बाय गो बाय गो; अशी विविध प्रकारची गाणी रसिकांना आणि महाराष्ट्राला सागरकडून ऐकायला मिळताहेत. गाड्या मॉडिफाय करणारा हा इंजिनयर मुलगा हातात माईक पकडून अगदी आत्मविश्वासाने ‘इंडियन आयडल मराठी’च्या विजेतेपदासाठी लढतो आहे. सागरच्या या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी आणि त्याची मधुर गाणी पाहण्यासाठी पाहा, ‘इंडियन आयडल मराठी’, सोम.-बुध., रात्री ९ वाजता, सोनी मराठी वाहिनीवर.

हेही वाचा :

Back to top button