पीडितेला मदत करण्याच्या बहाण्याने अनेकवेळा केला बलात्कार; हवालदारावर आरोप | पुढारी

पीडितेला मदत करण्याच्या बहाण्याने अनेकवेळा केला बलात्कार; हवालदारावर आरोप

पुढारी ऑनलाईन डेस्क : मदत करण्याच्या बहाण्याने पाेलिस हवालदाराने अनेकवेळा केला बलात्कार, अशी तक्रार उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद येथील एका २८ वर्षीय महिलेने दिली आहे. यानुसार संबंधित हवालदारावर गुन्हा दाखल झाला आहे. पीडित महिलेने २०१९ साली एका अन्य व्यक्तिविरोधातही  बलात्कारची तक्रार दिला होती.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, पीडितेने २०१९ मध्ये एका व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली होती. आरोपीने चुकीची ओळख सांगून मित्र बनवले. लग्नाच्या बहाण्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी त्या आरोपीस अटक केली होती. ही तक्रार दाखल करुन झाल्यानंतर काही दिवसानंतर आरोपी हवालदाराने पीडितेशी संपर्क साधला. या घटनेची माहिती गोळा करण्याच्या नावाखाली आरोपी नेहमी पीडितेला फोन करत होता. तिच्या घरी जात होता. पीडितेचा आरोप आहे की, डिसेंबर 2019 मध्ये पोलीस हवालदार तिच्या घरी पोहोचला. या दिवशी पीडिता घरी एकटीच होती. आरोपी कॉन्स्टेबलने तिला पिस्तूल दाखवून धमकावले आणि तिच्यावर बलात्कार केला.

याबाबत परिक्षेत्राचे अधिकारी म्हणाले, “आम्हाला महिलेकडून लेखी तक्रार मिळाली आहे. एका पोलीस हवालदाराने आपल्यावर बलात्कार केल्याचे तिने तक्रारीत म्‍हटलं आहे. आयपीसी कलम 376 (बलात्कार), 506 (गुन्हेगारी धमकावणे) आणि 504 (हेतूपूर्वक अपमान) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. आरोपी हवालदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या महिलेने पोलिसांनी सांगितले की, तिने पहिल्यांदा तक्रार दाखल केली नाही कारण हवालदाराने लग्न करण्याचे वचन दिले होते. मागील दोन वर्षात हवालदाराने अनेकवेळा बलात्कार केल्याचे त्या महिलेने म्हटले आहे.

“गेल्या आठवड्यात पीडितेला समजले की आरोपी विवाहित आहे.  त्याला 5 वर्षांचा मुलगा आहे. पीडितेचे म्हणणे आहे की, जेव्हा तिने कॉन्स्टेबलशी याबद्दल बोलले तेव्हा त्याने तिला याबद्दल कोणाशीही न बोलण्याची धमकी दिली. पोलिस अधिकाऱ्यांनी हवालदाराच्‍या विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

हेही वाचलंत का?

Back to top button