तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : सिड- मीराची लव्हेबल मोमेंट्स | पुढारी

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं : सिड- मीराची लव्हेबल मोमेंट्स

पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून आपला लाडका राणा दा म्हणजे, अभिनेता हार्दिक जोशी घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत त्याने सिद्धार्थची मुख्य भूमिका साकारली असून त्याला साथ आदितीने दिली आहे. सर्व अडथळे पार करत सिद्धार्थ आणि आदितीच्या लग्नाची घाई सुरू झाली आहे. या विवाहातील खास विधीचे फोटो आणि हटके व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाले आहेत.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतील नुकतेच सिद्धार्थ आणि आदितीचे लग्न पार पडले असून याचे काही फोटो आणि व्हिडिओ हार्दिकच्या इंन्स्टाग्रामवर पाहायला मिळाले आहेत. या विवाह सोहळ्यात सिद्धार्थने पिंक आणि पांढऱ्या रंगाची शेरवानी आणि आदितीने नारंगी रंगाची नऊवारी परिधान केली आहे. या विवाहातील हळदीचे फोटो आणि सिद्धार्थच्या डान्सचा व्हिडिओ शेअर झाला आहे. याशिवाय या लग्नात मालिकेतील कलाकारांनी देखील हजेरी लावली आहे. या मालिकेत अमृता पवारनेही भूमिका साकारली आहे. शेअर झालेल्या एका फोटोत लग्नातील एक विधी कलाकारंसोबत पार पडताना दिसत आहे.

याच दरम्यान सिद्धार्थसोबत एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात सिद्धार्थने चिमुकलीला लग्न कोणाचं आहे. असे विचारताच, तिनं सिद्धूध काकाचं. असे म्हटले आहे. यानंतर तिला सिद्धार्थने ‘तुझं लग्न करायचा का?’ असे विचारताच तिने ‘तुझ्यासोबत लग्न करायचे आहे?’ असे म्हटलं आहे. यावर पुन्हा सिद्धार्थने तुझ्या आईला विचार. असे म्हटलं आहे. यानंतर दोघेजण खूपच हासताना दिसले.

यावेळी चिमुकलीच्या एका हातात गुलाबाचे फुल असून तिने हार्दिकचा पाप्पा घेतला आहे. या चिमुकलीचे नाव मीरा असे आहे. हा मौजमस्तीचा व्हिडिओ खूपच चर्चेत आला आहे. या व्हिडिओतून सिड- मीराची लव्हेबल मोमेंट्स चाहत्यांना पाहायली मिळाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी आपआपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात एकाने तर ‘लग्नाला बोलवलं नाहीस रे’, ‘खूपच क्यूट’, ‘खूप गोड आहे ती’, ‘सुपर’, ‘लय भारी राणा दा’ अशा कॉमेंन्टस केल्या आहेत. परंतु, हा व्हिडिओ मालिकेतील आहे की नाही याचा अध्याप खुलासा झालेला नाही.

‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ ही मालिकेतून राणादा पुन्हा एकदा चाहत्याच्या घराघरात पोहोचला आहे. या मालिकेत ‘एकत्र कुटुंबपद्धती’ ही संकल्पना दाखवण्यात आली आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ही मालिका संपल्यानंतर हार्दिक जोशीने ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ यात एन्ट्री केली.

हेही वाचलंत का? 

Back to top button