HBD : जेव्हा सलमान खानला विचारलं जातं -'तू लग्न का करत नाहीस?' | पुढारी

HBD : जेव्हा सलमान खानला विचारलं जातं -'तू लग्न का करत नाहीस?'

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचे अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले. पण, दबंग सलमान खान मात्र अद्यापही अविवाहित आहे. वयाच्या ५५ व्या वर्षीदेखील त्याच्या लग्नाचा तिढा मात्र सुटलेला नाही. या वयातही लोक त्याला विचारतात की, तू लग्न का करत नाहीस?
आज दबंग खानचा बर्थडे आहे. त्यानिमित्त त्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.

मोस्ट एलिजिबल बॅचलर खानने आजपर्यंत लग्न केलेलं नाही. त्याचं नाव बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींशी जोडलं गेलं आहे. पण, ही गोष्ट कधीही लग्नापर्यंत येऊन पोहोचली नाही. या यादीत संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कॅटरीना कैफपर्यंत सर्वांची नावे समाविष्ट आहेत. आजदेखील फॅन्स तिच्या लग्नाची प्रतीक्षा करत आहेत. अनेक मुलाखतीत जेव्हा त्याला लग्नाविषयी प्रश्न विचारले जातात, तेव्हा तो हा प्रश्न टाळताना दिसतो.

एकदा त्याला एका मुलाखतीत लग्न न करण्याचं कारण विचारलं होत. यावेळी त्याने लग्न न करण्याची दोन कारणे सांगितली होती. त्यावेळी सलमानने म्हटलं होतं की, ‘तुम्हाला माझ्या वैयक्तिक आयुष्याविषयी माहिती आहेत. जोधपूर आणि मुंबई ॲक्सिडेंटमुळे दोन केसेस सुरू आहेत. आम्हाला विश्वास आहे की दोन्ही केस आम्ही जिंकू. पण, जर दुर्देवाने मला शिक्षा झाली तर? काय होईल? विचार करा त्याआधी जर मी लग्न केलं तर. काय हे योग्य असेल? की पती जेलमध्ये आहे…२, ३ आणि मुलं जेलमध्ये आपल्या वडिलांना भेटण्यासाठी जेलमध्ये येतील. इन्शाल्लाह, ही केस लवकरच निकलात लागली तर विचार करेन.’

तर एका मुलाखतीत दबंग खानच्या लग्नाविषयी सलीम खान यांना विचारण्यात आलं की, अखेर दबंग खान लग्न का करत नाही? यावर सलीम खान यांनी मजेशीर उत्तर दिलं की-‘तुम्ही मला कुठलाही प्रश्न विचारू शकता. पण, हे विचारू नका की, तो लग्न कधी करेल? याचं कुठलंही उत्तर माझ्याकडे नाही.’

टायगर ३ ची घोषणा

खान आगामी चित्रपट टायगर ३ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरीना कैफ मुख्य भूमिकेत आहे. याचे शूटिंग परदेशात झाले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Back to top button