एकदा नव्हे तीनवेळा साप चावला…; Salman Khan नं सांगितला थरार! | पुढारी

एकदा नव्हे तीनवेळा साप चावला...; Salman Khan नं सांगितला थरार!

पुढारी ऑनलाईन डेस्क

बॉलिवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Salman Khan) याचा आज वाढदिवस आहे. त्याचे चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर त्याच्या उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. सलमानला पनवेलमधील फार्महाउसवर साप चावला होता. पण सर्पदंश कसा झाला याबाबत स्वतः सलमाननं प्रसंग कथन केला आहे.

”फार्महाउसवर साप आला होता. त्याला मी काठीच्या मदतीने बाहेर घेऊन जात होतो. पण तो माझ्या हातावर आला. त्यानंतर मी त्याला सोडण्यासाठी पकडले. त्याचवेळी त्याने मला तीन वेळा दंश केला. तो एक प्रकरचा विषारी साप होता. साप चावल्यानंतर सहा तास मी रुग्णालयात उपचार घेतले. आता मी बरा आहे.” असे सलमाननं म्हटलं आहे.

सलमान त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फार्महाउसवर गेला होता. त्याचदरम्यान त्याला सर्पदंश झाला. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सलमाननं त्याचा वाढदिवस कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसोबत फार्महाउसवर साजरा करण्याचं ठरवलं आहे.
सलमानला (Salman Khan) साप चावल्याचे वृत्त समजताच त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता. पण सलमाननं आपण ठीक असल्याचे सांगताच त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

अभिनेता सलमान खानच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ‘बजरंगी भाईजान’ आहे. आता सलमान खानने नुकतीच बजरंगी भाईजानचा सीक्वल येणार असल्याची मोठी घोषणा केलीय. सलमान खान दिल्लीमध्ये कॅटरीना कैफसोबत ‘टायगर-३’ चे शूटिंग करणार आहे. सलमानकडे आणखी एक ‘कभी ईद कभी दिवाली’ हा चित्रपट आहे. पण, अधिकृतरित्या त्याने या चित्रपटाची घोषणा केलेली नाही.

हे ही वाचा :

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

Back to top button