पुढारी ऑनलाईन : छोट्या पडद्यावरील 'आई कुठे काय करते' ( Aai Kuthe Kay Karate ) ही मालिका चाहत्याच्या घराघरात पोहोचली आहे. या मालिकेत अरुंधतीलाला आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमान यासाठी सतत लढावं लागतं. तर संजना अर्थातच अरुंधतीच्या नवऱ्याची आधीची प्रेयसी आणि आताची पत्नी आहे.
पडद्यावर दोघाही एकमेंकीच्या विरोधात असल्या तरी पडद्यामागे या चांगल्या एकमेंकीच्या मैत्रीणी बनल्या आहेत. यामुळे मालिकेच्या बाहेर सेटवर यातील कलाकार धम्माल, मस्ती करताना दिसत आहेत. तर याच दरम्यान संजनाने आपल्या लाडक्या मैत्रीणीसाठी खास असा मेनू बनवून सेटवर आणला आहे.
आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karate ) या मालिकेत या 'अरूंधती'ची भूमिका अभिनेत्री मधुरीणी गोखले हिने तर 'संजना'ची नकारात्म भूमिका रूपाली चव्हाण साकारली आहे. ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपली आहे. पडद्यावर या दोघांची भूमिका एकमेंकाविरोधची आहे. परंतु, पडद्याच्या मागे दोहीही चांगल्या मैत्रीणी आहेत.
यामुळे खास करून संजनाने अरूधंतीसाठी आपल्या आईच्या हाताने बनवलेली बिर्याणी आणली आहे. यानंतर दोघांनी बिर्याणीवर मालिकेच्या सेटवरच ताव मारला आहे. याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर झाले आहेत. हा फोटो शेअर होताच चाहत्यांनी आश्चर्याचा धक्का बसला आहे. परंतु, हा सीन पडद्यामागचा आहे. या मालिकेने चाहत्यांना भुरळ घातली आहे.
हेही वाचलंत का?