महिलांची छेड अन् २५० जणांचा चावा घेणाऱ्या माकडाला सुनावली जन्मठेप | पुढारी

महिलांची छेड अन् २५० जणांचा चावा घेणाऱ्या माकडाला सुनावली जन्मठेप

मिर्झापूर (उत्‍त्तर प्रदेश); पुढारी ऑनलाईन डेस्‍क

देशातील न्यायालयांमध्ये अनेक वेगवेगळी प्रकरणे येत असतात. असेच एक माकडाचे प्रकरण न्यायालयासमोर आले. या प्रकरणात न्यायालयाने आपला निर्णय दिला. कानपूरच्या न्यायालयाने या माकडाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या माकडाला तुरूंगात न टाकता एका प्राणीसंग्रहालयात बंदिस्‍त ठेवण्यात आले आहे. आता त्‍याला आपले संपूर्ण जीवन या ठिकाणीच व्यतित करावे लागणार आहे. हे माकड भलतेच खोडकर होते. आतापर्यंत अनेक लोकांचा त्‍याने चावा घेतला आहे. तसेच महिलांची छेडही काढत असे, त्यामुळे या माकडाला जन्मभरासाठी या पिंजऱ्यात कैद करण्यात आले आहे.

माकडाने 250 लोकांचा चावा घेतलाय…

या माकडाचा उपद्व्याप इतका वाईट होता की त्याने सुमारे 250 लोकांचा चावा घेतला आहे. 250 लोकांना चावल्यानंतरही या माकडाचा हा प्रकार रोज सुरूच होता. रोज कोणी ना कोणीला या माकडाचा त्रास व्हायचा. त्यामुळेच या माकडाला रोखणे अत्यंत गरजेचे झाले होते.

महिलांशी छेडछाड…

हे माकड फक्त लोकांनाच चावत नाही, तर महिलांची छेड काढत असे. हे माकड महिलांकडे जाऊन विचित्र आवाज करत त्यांना पकडण्याचा प्रयत्न करत असे. अनेक उपचार करूनही माकडात सुधारणा झाली नाही. 4 वर्षांपासून या माकडावर डॉक्टर सतत उपचार करत होते. या माकडालाही बराच वेळ वेगळे ठेवण्यात आले होते. अनेकवेळा ते पिंजऱ्यात कैद झाले, पण त्याच्या वागण्यात मवाळपणा किंवा सुधारणा झाली नाही, त्यामुळे आता त्याला आता जन्मभर पिंजऱ्यात कैद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कलुआची दहशत

कलुआ असे या माकडाचे नाव असून त्याच्यावर कानपूर प्राणी उद्यानात उपचार सुरू आहेत. 2017 मध्ये काळूआला मिर्झापूर येथून पकडून येथे आणण्यात आले होते. मिर्झापूरमध्ये त्याची दहशत होती आणि रोज कुणाला तरी ते चावत असे. त्यामुळे तेथील लोकांसाठी तो धोका बनला होता.

तांत्रिकाने त्याला बिघडवले

असे म्हणतात की, हे माकड एका तांत्रिकाने वाढवल्यामुळे ते उपद्रव करत आहे. तांत्रिकानेच त्याला दारूचे व्यसनही लावले होते. तांत्रिक मेल्यावर हा माकड मोकळे झाले आणि मग त्याने तांडव करायला सुरुवात केली. 4 वर्षांच्या उपचारानंतरही माकडात कोणतीही सुधारणा न झाल्याने आता त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. माकडाला जंगलात सोडणे देखील धोक्याचे आहे कारण तिथे गेल्यावरही तो लोकांचे नुकसान करेल. त्यामुळे त्याला पिंजऱ्यात ठेवले आहे.

Back to top button