पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेत्री साई पल्लवी (Sai Pallavi) ने नागा चैतन्यसोबत मिळून चित्रपट 'लव्ह स्टोरी' मध्ये दमदार परफॉर्मन्स दिला होता. यामध्ये तिच्या आणि नागा चैतन्यच्या केमिस्ट्रीला लोकांनी खूप पसंद केलं होतं. 'लव्ह स्टोरी' तेलुगू चित्रपट आहे. साई (Sai Pallavi) आता आगामी चित्रपट 'श्याम सिंघा रॉय' मध्ये दिसणार आहे. (Sai Pallavi)
साई पल्लवी सध्या तेलुगू चित्रपट श्याम सिंह रॉय (Shyam Singha Roy) च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. यावेळी तिला माध्यमांनी एका सीनवरून प्रश्न विचारला. तो तिला अजिबात आवडला नाही.
तेलुगू फिल्म श्याम सिंह रॉय (Shyam Singha Roy) मध्ये साईसोबत अभिनेता नानी ( Nani) आणि कृति शेट्टी (Krithi Shetty) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची टीम एका मुलाखतीसाठी आली होती. मुलाखतीत किसिंग सीनवरून तिला असा काही प्रश्न विचारण्यात आला की, साई संतापली. तिने पटकन प्रतिक्रिया देत उत्तर दिले.
राहुल सांकृत्यान दिग्दर्शित श्याम सिंह रॉयमध्ये अभिनेता नानी डबल रोलमध्ये दिसणार आहे. हा चित्रपट बंगालच्या पार्श्वभूमीवर येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलरदेखील रिलीज होणार आहे. हा ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरला. या ट्रेलरमध्ये अभिनेता नानी (Nani KIssing Scene) आणि कृति यांचा एक किसिंग सीन आहे.
यावरून अँकरने तिला प्रश्न विचारला. कृति आणि नानीला प्रश्न विचारण्यात आला की, "किसिंग सीन देताना दोघांपैकी कोण अस्वस्थ होत होतं?" हा प्रश्न साईला अजिबात आवडला नाही. तिने मध्येचं थांबवलं. याप्रकारचे प्रश्न आम्हाला अस्वस्थ करतात. असले प्रश्न विचारू नका, अशी प्रतिक्रिया तिने दिली.
साई म्हणाली, याप्रकारचे प्रश्न खूप विचित्र वाटतात. सीनच्या आधी दोघांनी चर्चा केली होती. तेव्हा त्यांनी निर्णय घेतला की, चित्रपटाच्या कहाणीच्या मागणीनुसार, हा सीन करावा लागणार आहे. असे प्रश्न अनकंर्फ्टेबल करतात."
अँकरने याशिवाय आणखी एक प्रश्न विचारला. तेव्हाही साईने म्हटलं की "हे चुकीचं आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा एकचं प्रश्न करताय."