‘गणपत’ : टायगरच्या डोळ्याला दुखापत | पुढारी

‘गणपत’ : टायगरच्या डोळ्याला दुखापत

पुढारी ऑनलाईन

अभिनेता टायगर श्रॉफ हा त्याचा आगामी अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट ‘गणपत’च्या चित्रीकरणावेळी जखमी झाला आहे. स्वतः सेल्फी शेअर करून टायगरने ही माहिती दिली आहे. सध्या यूकेमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. शूटिंगवेळी टायगरच्या डोळ्याला दुखापत झाली. टायगरने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याचा सुजलेला डोळा दिसतो. त्याच्या डोळ्यांभवती काळे-निळे डाग दिसत आहेत.

कुणीतरी त्याच्या डोळ्यावर पंच मारल्यासारखे वाटत आहे. विकास बहल दिग्दर्शित या चित्रपटात कृती सेनन आणि एली अवराम यांच्याही भूमिका आहेत. ‘हीरोपंती’नंतर टायगर-कृती ही जोडी परत एकत्र दिसणार आहे.

अमिताभ बच्चन या चित्रपटात टायगरच्या वडिलांची भूमिका साकारू शकतात. या चित्रपटात टायगर एका बॉक्सरची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट 23 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. याशिवाय टायगर तारा सुतारियासोबत ‘हीरोपंती 2’मध्येही दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

 

View this post on Instagram

 

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff)

Back to top button