पुढारी ऑनलाईन
आपल्या बोल्ड ड्रेसमुळे नेहमीच सोशल मीडियावर ट्रोल होणारी उर्फी जावेद (Urfi Javed) यावेळी मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे. उर्फीने एका इंग्रजी वेबसाईटला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं की, ती कधीही कुठल्याही मुस्लिम व्यक्तीशी लग्न करणार नाही. सध्या ती भगवतगीता देखील वाचत आहे. (urfi javed)
बिग बॉस ओटीटीची एक्स कंटेस्टेंट उर्फी जावेद म्हणते, सोशल मीडियावर तिच्या बोल्ड लुकवरून तिला ट्रोल केलं जातं आहे. इंडस्ट्रीमध्ये तिचं कोणीही गॉडफादर नाही. तिने म्हटलं, "मी एक मुस्लिम मुलगी आहे. आणि मला सोशल मीडियावर सर्वात अधिक मुस्लिम लोकांद्वारे ट्रोल केलं जातंय. ते मला आक्षेपार्ह कमेंट करतात. मी इस्लामची प्रतिमा मलिन करत आहे. ते माझा द्वेष करतात.
ती पुढे म्हणाली, "ते आपल्या समुदायाच्या सर्व महिलांना कंट्रोल करू इच्छितात. त्यामुळे मी धर्म मानत नाही. ते मला यासाठीही ट्रोल करतात की, कारण, मी त्यांच्यानुसार कपडे घालत नाही. त्यांच्यानुसार मी माझ्या धर्माचे पालन नाही करत."
तिला विचारण्यात आलं की, तू कधी आपल्या समुदायाच्या एखाद्या व्यक्तीशी लग्न करशील, जर तुला त्याच्याशी प्रेम झालं तर? यावर उत्तर देताना उर्फी म्हणते, "मी कधीही मुस्लिम मुलाशी लग्न करणार नाही. मी कुठल्याही धर्माचं पालन नाही करत. त्यामुळे मला पर्वा नाही की, मी कुणावर प्रेम करते."
उर्फी असेदेखील म्हणते की, धर्मासाठी कुणावरही दबाव आणला जाऊ शकत नाही. आपला धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य असायला हवे. त्यांनी सांगितलं की, माझे वडील एक रूढीवादी व्यक्ती होते. जेव्हा मी १७ वर्षांचा होता. तेव्हा ते मला आणि माझ्या भाऊ-बहिणींना माझ्या आईजवळ सोडून गेले होते. माझी आई खूप धार्मिक महिला आहे; पण तिने कधीही आमच्यावर धर्माचा दबाव आणला नाही. माझे भाऊ-बहिणी इस्लामचे पालन करतात. आणि मी करत नाही. पण, ते कधीही माझ्यावर दबाव आणत नाहीत.
हेही वाचलं का?