पुढारी ऑनलाईन डेस्क : आपल्याकडे कोण कधी कशाची मिरवणूक काढतील हे सांगता येत नाही. लग्नाची मिरवणूक ही ठरलेली असते. नेतेमंडळी निवडणुकीत जिंकून आल्यानंतर मिरवणूक काढतात. पण मध्य प्रदेशमध्ये एका वेगळ्याच गोष्टीची मिरवणूक काढून जोरदार स्वागत केले आहे. या प्रसंगाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्या मुलांवर अनेकांच प्रेम असतं. मुलांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी वडिल कष्ट करत असतात. मुलं ज्या गोष्टींचा हट्ट करतात. त्या गोष्टींचा पुरवठा पालक करत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशमधील समोर आली आहे. म्हणतात ना हौसेला मोल नसतं. तसाच हा प्रकार आहे. आपल्या सात वर्षाच्या मुलीसाठी वडिलाने मोबाईल घेतला. फक्त मोबाईल घेऊन ते थांबले नाहीत तर त्याच स्वागतही जंगी केलं आहे.
मुलीला मोबाईल घेऊन देणारे वडील चहा विकतात. मध्य प्रदेशातील शिवपुरीमध्ये या चहावाल्याने त्यांच्या ७ वर्षांच्या मुलीसाठी मोबाईल विकत घेतला. त्यासाठी मोठ्या रथामध्ये बसून वडील-मुलगी आणि डीजेसह संपूर्ण शहराला दाखवण्यासाठी मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढली आहे. या मोबाईलच्या स्वागतात मोबाईलच्या किमतीपेक्षा जास्त खर्च केला आहे.
या मिरवणकीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी या व्हिडिओला 'वडील असावे तर असे' अशा कॅप्शन देऊन शेअर केला आहे.
हेही वाचलत का?