Lucifer : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची पुन्हा एन्ट्री?

Lucifer : सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर शहनाज गिलची पुन्हा एन्ट्री?

मुंबई, पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर त्याची गर्लफ्रेड शहनाज गिलवर दु:खाचा डोंगर कोसळला. यानंतर शहनाज गिल फिल्मी जगतापासून दूर राहिली होती. परंतु, सध्या ती 'लूसिफर' (Lucifer) या हॉलिवूड वेबसीरिजमधून पुन्हा फिल्मी जगतात पदार्पण करत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

शहनाज गिलने नुकतेच तिच्या इंस्टाग्रामवर 'लुसिफर' (Lucifer) चे एक पोस्टर शेअर केले आहे. या फोटोमध्ये शहनाजने हॉलिवूड अभिनेता टॉम एलिससोबत दिसत आहे. या पोस्टरमध्ये ती इंटेन्स लुकमध्ये दिसत आहे. यासोबत शहनाजने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,'खरा बिग बॉस आला आहे. #NetflixIndiaPlayback2021 #Playback2021′. यासोबत तिने सबटाईटलमध्ये Hell has got a new roommate. असे लिहिले आहे.

हे पोस्टर सोशल मीडियावर शेअर होताच चाहच्यांनी कॉमेन्टस करत अनेक तर्क- वितर्क लावले आहेत. यात काही युजर्संनी 'तुम्ही परत फिल्मी जगतात एन्ट्री करताय आम्हाला खूपच आनंद झाला आहे.' तर काही युजर्संनी 'ही जाहिरात किंवा मालिकेचे प्रमोशन असेल' असे तर्क लावला आहे. मात्र याबाबत अजून स्पष्टपणे कोणतीही माहिती मिळालेली नाही.

याआधी शहनाज गिल शेवटची 'हौसला रख' (Honsla Rakh) , पंजाबी गायक दिलजीत दोसांझा आणि सोनम बाजवासोबत दिसली होती. शहनाजच्या अभिनयाला आतापर्यत चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. सिद्धार्थ शुक्ला याचे २ सप्टेंबर २०२१ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. त्याचे वयाच्या ४० व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

सिद्धार्थ अचानक झालेल्या निधनाने शहनाज गिलवर दु:खाचा डोंगर कोसळला. सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल हे बिग बॉस १३ मध्ये एकत्रित सहभागी झाले होते. त्याच्या निधनानंतर शहनाज बॉलिवूडसह सोशल मीडियापासून दूर राहिली आहे.

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shehnaaz Gill (@shehnaazgill)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news