Union Ministry of Health : ओमायक्राॅनचा धोका वाढतोय | पुढारी

Union Ministry of Health : ओमायक्राॅनचा धोका वाढतोय

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा (Union Ministry of Health) ओमायक्राॅन संसर्गाचा वाढता वेग पाहता ‘वाॅर रुम’ची आवश्यकता असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यासंदर्भात कोणते प्रतिबंधात्मक उपाय योजना करायच्या, याची सूचना केंद्राने राज्यांना दिलेल्या आहेत. त्यामध्ये नाईट कर्फ्यू आणि चाचण्याची संख्या वाढवली पाहिजे, अशा सूचनांचा अंतर्भाव केलेला आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने (Union Ministry of Health) जारी केलेल्या पत्रात असं म्हंटलं आहे की, “स्थानिक परिस्थितीचा विचार करून योग्य त्या उपाय योजनांचा निर्णय घेतले पाहिजेत. त्यालाच ‘थ्रेशोल्ड लिमिट्स’ म्हणतात. त्या संदर्भात मार्गदर्शक तत्वे सांगण्यात आलेली आहेत. नव्या व्हेरियंटचा वाढता वेग आणि संक्रमण प्रभावित स्थळावरून आलेली आकडेवारी यांची बारकाईने तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कर्नाटक राज्याने ३० डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत राज्यात कोणत्याही पार्टीचे आयोजन करण्यास बंदी घातलेली आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, “कोरोना आणि ओमायक्राॅनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नवीन वर्षांतील सणांवर ही बंदी घालण्यात आली आहे.” चेन्नईमध्येही समुद्र किनाऱ्यावरीही फिरणाऱ्या पर्यटकांवर बंदी घातलेली आहे.

मुंबई महापालिकनेदेखील ख्रिसमस आणि नव्या वर्षांच्या पार्श्वभूमीवर सूचना केलेल्या आहेत. तसेच लग्न समारंभ आणि इतर आनंद सोहळ्यांवरही कडक निर्बंध लावण्याचे सांगण्यात आले आहे. लोकांना गर्दीपासून वाचण्याचे सांगण्यात आले आहे. हाॅटेल, रेस्टाॅरंट, माॅल, बार आणि सार्वजनिक ठिकाणांवर गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी कोविट प्रोटोकाॅल पालन करण्यास सांगितले आहे.

पहा व्हिडीओ : अखेर कुत्र्यांची हत्या करणाऱ्या वानरांना केले जेरबंद…

Back to top button