Rajeshwari Kharat Meams : राजेश्वरी खरात, घरात, दारात… पेपर ड्रेसवरुन राजेश्‍वरी ट्राेल

Rajeshwari Kharat Meams : राजेश्वरी खरात, घरात, दारात… पेपर ड्रेसवरुन राजेश्‍वरी ट्राेल
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा 'फॅंड्री' (Fandry) हा चित्रपट  २०१३ साली प्रदर्शित झाला. या  चित्रपटात 'शालू' या शाळकरी मुलीची भूमिका साकारणारी राजेश्वरी खरात (Rajeshwari Kharat) तरुणाईच्‍या पसंतीस उतरला. राजेश्‍वरी साेशल मीडियावर  कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी साडीतील, कधी हॉट फोटोज तर कधी हटके फोटोज चाहत्यांशी शेअर करत असते. (Rajeshwari Kharat Meams) यामूळे ती बर्‍याचवेळा ट्रोलही हाेते.

काही दिवसांपूर्वी राजेश्वरीने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून न्यूजपेपर डिझाईन (Newspaper Dress)असलेला फोटो शेअर केला होता. यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता या फोटोवरुन ती ट्राेल झाली आहे.

याचदरम्यान स्पर्धा परिक्षांमधील अनेक घोटोळे झाले, म्हाडा परीक्षा पेपरफूटी प्रकरण झालेले यामूळे काही सोशल मीडिया युझर्सनी मिष्कीलपणे तिच्या न्यूजपेपर डिझाईन ड्रेसवर कॉमेंट केली की, 'म्हाडाचा फुटलेला पेपर इथं आहे तर, तर एकजण म्हणतं आहे, 'तरीच म्हटलं माझा पेपर कुठं गेला.' आज सकाळीचा पेपर का नाय आला हे समजलं.

Rajeshwari Kharat Meams

राजेश्वरीच्या न्यूजपेपर डिझाईन ड्रेसवर भन्नाट कॉमेंट्स बरोबरचं तिच्यावर नेटकर्‍यांनी मिम्स बनवले आहेत. एका मिममध्ये 'फॅंड्री' मधील जब्याचा फोटो घेवून लिहलं आहे, हा पेपर फुटला पाहिजे लका, एकाने राजेश्वरीचे चार फोटो घेवून तिच्या आडनावाशी यमक जूळवुन मिम केलं आहे की, राजेश्वरी खरात, राजेश्वरी घरात, राजेश्वरी दारात, राजेश्वरी पेपरात, तर एका मीममध्ये तिचा न्यूजपेपर डिझाईन ड्रेस फोटो घेवून लिहलं आहे, नुकतीचं MPSC पोस्ट काढलेला तो, मला दररोज पेपर वाचायला आवडतो.. असे बरेच मिम्स राजेश्वरीच्या न्यूजपेपर डिझाईन ड्रेसवर केले आहेत.

राजेश्वरीने 'फँड्री' नंतर 'आयटमगिरी' या मराठी चित्रपटातून अभिनय केला. लवकरचं ती पुणे टू गोवा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

हेही वाचलं का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news