PK : ‘पीके’च्या शूटिंगवेळी पानवाला सेटवर ठाण मांडून बसायचा, आमीर खान रोज इतकी पानं खायचा!

aamir khan
aamir khan
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क

PK बॉलिवूडमधील सर्वात सुपरहिट चित्रपटांपैकी एक. यामध्ये आमीर खान, अनुष्का शर्मा, सुशांत सिंह राजपूत, संजय दत्त आणि बोमन ईरानी यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटातील एक मजेदार किस्सा म्हणजे खाऊच्या पानांचा. तुम्हाला माहितीये का, PK चित्रपटात आमीर खान पान खाताना दाखवण्यात आलंय; पण, शूटिंगवेळी आमिर रोज किती पान खायचा? त्याच्यासाठी एक पानवाला सेटवर ठाण मांडून बसलेला असायचा. जेव्हा जेव्हा शूटिंग करताना पान खाण्याची गरज वाटायची तेव्हा पान खावं लागायचं. पण, जेव्हा एखाद्याला पानाची सवय नसेल आणि त्याला ५०-६० वेऴा पान खायाला लागत असेल तर मात्र नंतर त्याची 'तलफ' कदाचित निर्माण होऊ शकते.

बॉलीवूडचे मिस्टर परफेक्टनिस्ट आमीर खान या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आता तो आपल्या तिसऱ्या लग्नावरून चर्चेत आहे. तर कधी तो त्याचा आगामी चित्रपट लाल सिंह चड्डा मुळे चर्चेत असतो. ताे प्रत्येक चित्रपट काहीतरी नवं घेऊन येतो. तो वर्षभरात एखादा तरी सुपरहिट चित्रपट देतो. प्रत्येक चित्रपटात त्याचा नवा लूक पाहायला मिळतो.असाच एक चित्रपट पीके होय. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटातील भूमिकेसाठी आमीर खानने जीवतोड मेहनत घेतली होती.

आमीर खान पूर्णपणे ऑनस्क्रीन भूमिका साकारण्यासाठी स्वत:ला समर्पित करतो. याचं कारणामुळे चित्रपट दंगलसाठी त्याला आपलं वजन वाढवावं लागलं होतं. पीके चित्रपटात तो एका एलियनच्या भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या यशानंतर भारतातचं नव्हे तर परदेशातही या चित्रपटाने जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता.

आमीर खान दरराेज करायचा १०० पाने गटम

PK चित्रपटातील एक मजेदार किस्सा सांगितला जातो. पीके चित्रपटात आमीर खान आपल्या भूमिकेसाठी एका दिवसात १०० हून अधिक पानं खायचा. चित्रपट पीके रिलीज होऊन सात वर्षे झाली आहेत. पण, जेव्हा केव्हा हा चित्रपट टीव्हीवर लागतो, तो पाहिल्याशिवाय मन राहवत नाही. तो पुन्हा पुन्हा पाहावासा वाटताे.

आमीर खानला वाटायचं की, तो पान खाऊन ही भूमिका चांगली करू शकेल. त्यामुळे अभिनय आणखी चांगला होईल. एका वेबसाईटने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आमीर खानला एका पत्रकार परिषदेत एक प्रश्न विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा होता की, चित्रपटासाठी तुला किती पाने खावी लागली. तेव्हा आमीर म्हणालाकी, मला पान खायची सवय नाही. पण, भूमिकेसाठी तो एका दिवसात जवळपास ५०-६० पाने खायचा. नंतर याची संख्या १०० वर गेली.

एक मुलाखतीत आमिर म्हमाला की, शूटिंगवेळी प्रत्येक टेकसाठी तोंडात पान भरावं लागायचं. आपल्या ओठांवर पानांचा खरा रंग आणण्यासाठी १०-१५ पाने खायला लागायची. रोज सेटवर ताजी पाने घेऊन एक पानवाला उपस्थित असायचा.

दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या या चित्रपटात आमीर खान मुख्य भूमिकेत होता. त्याच्यासोबत बॉलीवूड अदाकारा अनुष्‍का शर्मा आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचीदेखील मुख्य भूमिका होती. अनुष्‍का शर्माने पत्रकाराची भूमिका साकारली होती. सौरभ शुक्‍ला यांनी गुरूजीची भूमिका साकारली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news