चीन उठला गाढवांच्या जीवावर! धक्कादायक माहिती आली समोर

चीन उठला गाढवांच्या जीवावर! धक्कादायक माहिती आली समोर

हैदराबाद वृत्तसंस्था : भारतातून गाढव हा प्राणी आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही दिवसांत गाढवांची संख्या वेगाने कमी होत चालली आहे. सन 2012 च्या तुलनेत देशात गाढवांच्या संख्येत आता तब्बल 61.23 टक्के घट झाल्याची धक्कादायक माहिती 'ब्रुक इंडिया'च्या सर्व्हेतून समोर आली आहे.

भारतातच नव्हे तर जगभरात गाढवांची संख्या कमी होत आहे. त्यातही चीनचा हात असल्याचे समोर आले आहे. चीनमध्ये पारंपरिक औषध बनविण्यासाठी गाढवाच्या अवयवांचा वापर केला जातो. त्यामुळे गाढवाच्या कातड्यासह अन्य अवयवांची भारतातून चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जात असल्याचे उघडकीला आले आहे.

ब्रुक इंडियाने आपला अहवाल पशुसंवर्धन विभागाला सादर केला आहे. गदर्भसंवर्धन मोहीम न राबविल्यास गाढव आपल्याला चित्रांतूनच बघायला मिळेल, अशी स्थिती आहे.

आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या काही भागांमध्ये गाढवांची हत्या केली जात आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये ब्रुक इंडियाने गाढवांच्या स्थितीचे सर्व्हेक्षण केले. अनेक गाढव मालक, पशु व्यापारी, पशु मेळ्यांचे आयोजक आणि राज्य आणि केंद्रीय पशुसंवर्धन अधिकार्‍यांशी ब्रुक इंडियाने चर्चा केली.

ब्रुक इंडियाचे शरत के. वर्मा यांनी एका वृत्तसंस्थेला सांगितले, की एका पशू व्यापार्‍याशी काही वर्षांपूर्वी चीनमधून एकाने महिन्याला 200 गाढवे खरेदी करण्यासाठी संपर्क केला होता. चीनमध्ये गाढवाचे कातडे, जिवंत गाढवे, चामडे आणि मांस सारेच मूल्यवान मानले जाते. या सगळ्यांची चीनमध्ये चोरटी निर्यात होत असते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news