Sonalee Kulkarni photo : बाई मी लाडाची कैरी पाडाची... | पुढारी

Sonalee Kulkarni photo : बाई मी लाडाची कैरी पाडाची...

मुंबई; पुढारी ऑनलाईन: मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ आणि अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे ( Sonalee Kulkarni photo )   ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’  चित्रपट रिलीज झाले आहेत. ‘पांडू’ या चित्रपटाने चाहत्यांच्‍या पसंतीस उतरला आहे. तर ‘झिम्मा’ या चित्रपटात सात मैत्रीणींचा कथा दाखवण्यात आली आहे. याच दरम्यान सोनाली सोशल मीडियावर सक्रिय असून आपले फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. सध्या सोनालीच्या अशाच एका स्कर्ट-टॉपच्या फोटोंनी ( Sonalee Kulkarni photo ) सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

नुकतेच सोनालीचे ‘पांडू’ आणि ‘झिम्मा’ हे चित्रपट सिनेमा घरात दाखल झाल्याने ते पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. ‘पांडू’ चित्रपटात सोनालीने एका ‘केळेवाली’ ची भूमिका साकारली आहे. याच दरम्यान तिने आपल्या इंन्स्टाग्रामवर नुकतेच काही फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत ती निळ्या रंगाच्या स्कर्ट-टॉपमध्ये दिसत आहे. या फोटोंनी सोनालीच्या सौंदर्यात आणखीण भर पडली आहे. या फोटोंच्या कॅप्शनमध्ये तिने ‘खूपच दिवसांनी स्कर्ट-टॉप’ लिहिले आहे. यातील विशेष म्हणजे, तिच्या निळ्या रंगाच्या ड्रेसवर मोठी रंगीबेरंगी फुले पाहायला मिळत आहेत.

हे फोटो सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांनी कॉमेंन्टचा पाऊस पडत आहे. यात एकाने ‘बाई मी लाडाची कैरी पाडाची..’तर दुसऱ्या एकाने ‘या मराठमोळी अप्सरेसमोर फुलं देखील फिकी पडतील.’ तर आणखी एकाने ‘सुंदर, ग्लॅमरस दिसत आहेस’ असे म्हटलं आहे.

सोनालीने हा लुक तिचा नवीन शो ‘किचन कलाकार’ साठी केला असल्याचे बोलले जात आहे. याशिवाय सोनाली कुलकर्णी आणि पुष्कर जोग यांच्या आगामी ‘व्हिक्टोरिया’ चित्रपट लवकरच येत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button