sarpanch election : ‘सरपंच’पदाचा लिलाव ४४ लाखांना, ग्रामस्‍थ लिलावातील पैसे गावाच्‍या विकासासाठी वापरणार | पुढारी

sarpanch election : 'सरपंच'पदाचा लिलाव ४४ लाखांना, ग्रामस्‍थ लिलावातील पैसे गावाच्‍या विकासासाठी वापरणार

भोपाळ ; पुढारी ऑनलाईन : मध्य प्रदेशच्या एका खेड्यात सरपंच निवडीसाठी अनोखी पद्धत वापरण्यात आली आहे. दरम्यान याची चर्चा देशभर होत आहे. अशोकनगर जिल्ह्यातील भटौली ग्रामपंचांयत निवडीसाठी तब्बल ४४ लाख मोजावी लागले आहेत. ते सरपंच पदासाठी प्रमुख दावेदार होते. (sarpanch election)

सरपंच पदासाठी लिलाव करण्यात आला, जी काही लिलावाची रक्कम होईल ती गावाच्या विकासासाठी करण्यात येईल असा ठराव गावकऱ्यांनी केला होता. यामुळे गावात बराच भ्रष्टाचार थांबेल असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. याचबरोबर गावात दोन गटात तणाव रोखण्यासाठी मदत झाली आहे. तसेच गावच्या विकासासाठी गावकऱ्यांनी एकजूट दाखवल्याचे सांगण्यात आले.

sarpanch election : २१ लाखांपासून बोलीला सुरूवात

सरपंच निवडीसाठी गावात पहिली बोलीला २१ लाख रुपयांपासून सुरूवात झाली. यानंतर ही बोली ४३ लाखांवर पोहोचली आहे. दरम्यान, ४४ लाखांची बोली लावणार्‍या उमेदवाराची सरपंचपदी निवड करण्यात आले.

सौभागसिंग यादव असे नवनियुक्त सरपंचाचे नाव आहे; पण शासकिय नियमानुसार सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासह योग्य निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. या पंचायतीत सरपंचपदासाठी अन्य कोणीही निवडणूक लढवणार नाही. सौभागसिंग यादव यांची एका मंदिरातील बोलीत एकमताने निवड करण्यात आली. ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत करून नूतन सरपंच घोषित केले. पंचायत निवडणुकीत त्यांच्या विरोधात कोणीही अर्ज भरणार नाही, हेही निश्चित करण्यात आले.

मासिक पाळीच्या अगोदर शारीरिक, मानसिक त्रास, ‘या’ समस्येसाठी ही आहेत होमिओपॅथिक औषधे

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर काँग्रेसचे आरोप

मध्य प्रदेशमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जानेवारी ते फेब्रुवारी दोन महिन्यात राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान शिवराज सिंह चौहान सरकारवर काँग्रेसने आरोप केला आहे.राज्यातील आगामी पंचायत निवडणुकांसाठी आरक्षण पद्धतीमध्ये उल्लंघन केल्याचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयात काँग्रेसने याचिका दाखल केली आहे.

हेही वाचलं का? 

Back to top button