सोनाली कुलकर्णी-पुष्कर जोग यांच्या ‘व्हिक्टोरिया’ची उत्सुकता | पुढारी

सोनाली कुलकर्णी-पुष्कर जोग यांच्या 'व्हिक्टोरिया'ची उत्सुकता

पुढारी ऑनलाईन

सोनाली कुलकर्णी-पुष्कर जोग यांच्या “व्हिक्टोरिया” चित्रपटाटी उत्सुकता लागून राहिलीय. निर्माता आनंद पंडित आणि पुष्कर स्कॉटलंडमध्ये त्यांच्या तिसऱ्या मराठी चित्रपट “व्हिक्टोरिया” साठी पुन्हा एकत्र आले आहेत. सोनाली कुलकर्णी-पुष्कर जोग यांच्या या चित्रपटात महत्‍वाची भूमिका आहे.

ती आणि ती , वेल डन बेबी चित्रपटाच्या यशानंतर आनंद पंडित मोशन पि्चर्स एल एल पी आणि गुसबम्प्स एंटरटेनमेंट पुन्हा एकदा एक नवीन चित्रपट घेवून येत आहेत. नुकतेच त्यांनी व्हिक्टोरिया या मराठी चित्रपटाची घोषणा केली.

पुष्कर आणि सोनाली सोबत आशय कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका चित्रपटात आहे. हीरा सोहल ही अभिनेत्री पदार्पण करत आहे. तर
जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी हे दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. या चित्रपटाची कथा , पटकथा व संवाद ओमकार गोखले , जीत अशोक आणि विराजस कुलकर्णी यांनी लिहिले आहेत.

आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि पुष्कर जोग यांची निर्मिती संस्था गुसबम्पस एंटरटेनमेंट चा एकत्रित तिसरा मराठी चित्रपट आहे. तसेच अभिनेता पुष्करचा सोनालीसह हा तिसरा चित्रपट आहे , या पूर्वी ती आणि ती , तमाशा लाईव हे दोन चित्रपट त्यांनी केले आहेत. आनंद पंडित, रूपा पंडित आणि पुष्कर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. वैशल शाह हे सह निर्माते आहेत. नुकतेच या चित्रपटाच्या मुहूर्त संपन्न झाला. या बिग बजेट चित्रपटाची शूटिंग स्कॉटलंड येथे होणार आहे.

हेही वाचलं का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Pushkar Suhas Jog (@jogpushkar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

Back to top button