Harnaaz Sandhu : कच्चा रस्ता ते रेड कार्पेट… हरनाज संधूचा प्रवास

कच्चा रस्ता ते रेड कार्पेट… हरनाज संधूचा प्रवास
Harnaaz Sandhu : कच्चा रस्ता ते रेड कार्पेट… हरनाज संधूचा प्रवास
Harnaaz Sandhu : कच्चा रस्ता ते रेड कार्पेट… हरनाज संधूचा प्रवास
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : कच्चा रस्त्यापासून सुरु झालेला हरनाज संधूचा (Harnaaz Sandhu) प्रवास हा एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखा आहे. कोणी विचारही केला नसेल की एका मातीच्‍या रस्त्यावर फोटो काढणारी मुगली एक दिवस 'मिस युनिव्हर्स' होईल.

इस्राइलमधील इलात येथे पार पडलेल्या स्पर्धेत हरनाज संधूने मिस युनिव्हर्स २०२१ हा किताब पटकवला. हा किताब भारताला तब्बल २१ वर्षांनी मिळाला. तिच्‍या या ऐतिहासिक कामगिरीमुळे काेट्यवधी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. भारताला हा किताब १९९४ साली भारताच्या सुश्मिता सेनला मिळवला. त्यानंतर २००० मध्ये लारा दत्तानेही सुश्मिता सारखीच कामगिरी केली हाेती.

सुमारे पाच वर्षांपूर्वी हरनाज संधूने तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आणि फोटो शेअर केले होते. यामध्ये ती एका व्हिडीओमध्ये कच्च्या रस्त्यावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो पोझ देत आहे. तिने ब्लॅक आणि ऑरेंज कलरची प्लाझो घातली आहे. एका फोटोमध्ये ती सिम्पल लूकमध्ये जिन्समध्ये दिसत आहे. हे फोटो आणि व्हिडिओ पाहून कोणालाही वाटलं नसेल की, एक दिवस ही युवती मिस युनिव्हर्स होईल. कारण इन्‍टावर दरराेज असे लाखाे फाेटाे अपलाेड हाेत असतात. मात्र हरनाज ही या सगळ्यांमध्‍ये वेगळी ठरली. आत्‍मविश्‍वास आणि आपल्‍याला काेणते ध्‍येय साध्‍य करायचे आहे याची अचूक जाण यामुळे तिने पराग्वे आणि दक्षिण आफ्रिकेच्या सौंदर्यवतींना मागे टाकत मिस युनिव्हर्स मुकुटावर आपलं नाव कोरलं.

हरनाज मूळची चंदीगडची आहे. तिची आई डॉक्टर आहे. हरनाजने लोकप्रशासन या विषयाची पदवी घेतली आहे. फिटनेस प्रेमी असलेली हरनाज योगाला प्राधान्य देते. हरनाजने मिस युनिव्हर्स हा किताब पटकावयाच्या अगोदर २०१७ साली टाईम्स फ्रेश फेस मिस चंदीगड, २०१८ साली तिने मिस मॅक्स इमर्जिंग स्टार, २०१९ फेमिना मिस इंडिया पंजाब जिंकला पटकावला. हरवाजने हरनाजचे बाई जी कूटेंगे, यारा दियां पू या दोन पंजाबी चित्रपटात अभिनय केला आहे.

स्वतःवर विश्वास ठेवा

पहिल्या टॉप तीन राउंडमध्ये स्पर्धकांना काही प्रश्न विचारले गेले. 'आजच्या काळात येणाऱ्या दबावांना कसे सामोरे जायचे याबद्दल तरुण महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल', असे तिला परीक्षकांनी विचारलं. त्यावर हरनाज म्‍हणाले की, "आजच्या तरुणाईवर सर्वात मोठा दबाव आहे, तो म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणे. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा.

"अनेक लोकांना हवामान बदल ही लबाडी वाटते, याबद्दल तुम्ही त्यांना खरे काय हे पटवून देण्यासाठी काय कराल?" या प्रश्‍नावर तिने उत्तर दिले की, आता कमी बोलून कृती करण्याची हीच वेळ आहे. कारण आपली प्रत्येक कृती निसर्गाला वाचवू शकते अथवा नष्टही करु शकते. पश्चात्ताप आणि दुरुस्ती करण्यापेक्षा प्रतिबंध आणि संरक्षण करणे चांगले आहे. तिच्या चा उत्तराने परीक्षक प्रभावित झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news