पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पोरगं मजेतय’ चित्रपट ‘संत तुकाराम’ पुरस्काराने सन्मानित | पुढारी

पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : ‘पोरगं मजेतय’ चित्रपट ‘संत तुकाराम’ पुरस्काराने सन्मानित

पुढारी ऑनलाईन डेस्क

१९ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटाला सन्मानित करण्यात आले. पुणे फिल्म फाऊंडेशन आणि राज्य सरकारतर्फे आयोजित या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये या चित्रपटाने ‘संत तुकाराम’ने सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. तसेच या चित्रपटासाठी शशांक शेंडे यांना सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार मिळाला आहे. सर्वाधिक पुरस्कार मिळवत या महोत्सवात ‘पोरगं मजेतय’ चित्रपटाने बाजी मारली.

‘पोरगं मजेतय’ या चित्रपटासाठी विजय शिंदे, मकरंद माने आणि शशांक शेंडे हे त्रिकुट एकत्र आलं आहे. आपल्या या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना हे तिघंही सांगतात की, ‘उत्तम आशयसंपन्न कलाकृतीसाठी एकत्र येत आम्ही ‘पोरगं मजेतय’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला. आज वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवात तो गाजत असून पुण्यातील महोत्सवात पुरस्काराने त्यावर यशाची मोहोर उमटवली आहे’.

झी समूहासारख्या नामांकित माध्यम कंपनीचा अनुभव गाठीशी घेऊन दर्जेदार मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी विजय शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे आगामी मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज असून नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’ आणि ‘बहुरूपी प्रोडक्शन्स’ यांची निर्मिती असलेला ‘पोरगं मजेतय’ हा चित्रपट त्यापैकीच एक आहे.

बाप लेकामधल्या तरल नात्याचा भावनिक प्रवास ‘पोरगं मजेतय’ या चित्रपटातून उलगडला जाणार आहे. मराठी चित्रपट चांगल्या आशय विषयांवर चालतात हे लक्षात घेऊन वेगळे विषय प्रेक्षकांसमोर आणण्याचा आमचा यापुढेही मानस असल्याचे निर्माते विजय शिंदे सांगतात.

Back to top button