१८ वर्षांवरील प्रेक्षकांनीचं पाहावा महेश मांजरेकर यांचा नवा चित्रपट

Mahesh Manjrekar upcoming new film Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha
Mahesh Manjrekar upcoming new film Naay Varanbhaat Loncha Kon Naay Koncha
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन

आशय, विषय आणि सादरीकरण यात नेहमी वैविध्य राखीत महेश मांजरेकर यांनी अनेक कलाकृती केल्या आहेत. त्यामुळे त्यांचा येणारा प्रत्येक चित्रपट हा प्रेक्षकांसाठी मेजवानीच असते. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्यांच्या 'अंतिम' या हिंदी चित्रपटाचं सिनेरसिकांकडून जोरदार कौतुक होतंय. आता नव्या वर्षात ते एक नवा मराठी चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' असं वेगळं शीर्षक चित्रपटाचं आहे. महेश मांजरेकरांचा हा नवा चित्रपट २१ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. चित्रपटाच्या पोस्टरनंतर नेमके कोणते कलाकार या चित्रपटात झळकणार? कोणती भूमिका साकारणार? याकडे रसिक प्रेक्षकांच्या नजरा आहेत. ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांनी लिहिलेल्या 'वरनभात लोन्चा नि कोन नाय कोन्चा' या कथेवर हा चित्रपट आधारित आहे. चित्रपटाची पटकथा व दिग्दर्शन अशी दुहेरी जबाबदारी मांजरेकर यांनी सांभाळली आहे.

'एन एच स्टुडिओज' ने चित्रपटाच्या प्रस्तुतीची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने 'एन एच स्टुडिओज' मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहेत. या चित्रपटाची निर्मिती नरेंद्र हिरावत व श्रेयांस हिरावत यांनी केलीय. सहनिर्मिती 'नाईंटीनाईन प्रोडक्शन्स'च्या विजय शिंदे यांनी केली आहे.

मांजरेकर यांच्या आजवरच्या चित्रपटांची लोकप्रियता लक्षात घेता 'नाय वरनभात लोन्चा कोन नाय कोन्चा' हा चित्रपट ही त्याला अपवाद नसेल. २१ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news