IMdB Topper दिशा पटानीने कार्तिक, पृथ्वीराज सुकुमारनलाही टाकले मागे

दिशा पटानी
दिशा पटानी

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिशा पटानीची फॅशन असो वा अभिनय कायम चर्चेत राहून ती प्रेक्षकांना मोहित करते. आता IMdB च्या नवीन यादीत तिची लोकप्रियता स्पष्ट झाली असून अलीकडेच लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची साप्ताहिक यादी जाहीर केली यात दिशाने पहिले स्थान मिळवले आहे.

अधिक वाचा –

या महिन्याच्या सुरुवातीला तिच्या वाढदिवशी रिलीज झालेल्या 'कल्की 2898 एडी' मधील तिच्या मनोरंजक फर्स्ट लूकमुळे गेल्या आठवड्यात ९ व्या स्थानावर असलेली ही अभिनेत्री पहिल्या क्रमांकावर आली आहे. या अभिनेत्रीने पृथ्वीराज सुकुमारन, कार्तिक आर्यन, नाग अश्विन, अनुराग कश्यप आणि इतरांसारख्या प्रसिद्ध सेलिब्रिटींना मागे टाकले आहे.

अधिक वाचा –

दिशा पटानीने तिची अभिनय क्षमता इतक्या प्रभावशाली पातळीवर सिद्ध केली आहे की चाहत्यांच्या प्रेमामुळे ती सर्वात प्रतिष्ठित यादींपैकी एक बनली आहे.

अधिक वाचा –

कल्की 2898 एडी'मध्ये दिशा प्रभास, दीपिका पदुकोण आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट २७ जून, २०२४ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ती हिंदी चित्रपट 'वेलकम टू द जंगल' आणि सुर्या स्टारर तामिळ चित्रपट 'कंगुवा' मध्ये काम करत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IMDb India (@imdb_in)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news