bigg बॉस marathi 3 : तृप्ती देसाई म्हणते, ‘तू लंबी रेस का घोडा’ | पुढारी

bigg बॉस marathi 3 : तृप्ती देसाई म्हणते, 'तू लंबी रेस का घोडा'

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : बिग बॉस मराठीच्या ( bigg बॉस marathi 3 ) घरामध्ये तीन सदस्य तृप्ती देसाई, स्नेहा वाघ आणि आदिश वैद्य आज जाणार आहेत. घरामध्ये जाताच सदस्यांना ते कुठे चुकत आहेत?, कोण बरोबर खेळत आहेत?, कोणाचा खेळ त्यांना आवडत आहे? हे या तिघांनी सांगितले आहे.

यावेळी bigg बॉस marathi 3 घरात स्नेहाने जयला खडेबोल सुनावले तर विशालचे तृप्ती ताईंचे भरभरून कौतुक केले. तृप्तीकडून झालेल्या कौतुकामुळे विशालला अश्रु अनावर झाले.

तृप्तीताई यावेळी म्हणाल्या की, “विशाल एकदम मस्त… मागच्या आठवड्यात जो ट्रक चेंज केला ना, वन मॅन आर्मी. जे मी पहिल्यापासून सांगत होतेकी, कुठेतरी चेंज झाला पाहिजे. यापुढे तृप्ती म्हणाल्या की, ”सत्य परेशान हो सकता है पराजित नही ! लंबी रेस का घोडा है ! मस्त एकदम.” आणि मी सगळ्यांना सांगितलं की, सगळ्यात छान मनं आमच्या विशालचं आहे, की ज्याच्या मनामध्ये काहीच चुकीचं कधी नसतं…”.

यानंतर तृप्तीताई मीराला म्हणाल्या की, तू फटक्यांमध्ये लक्ष्मी बॉम्ब आहेस, तर मीनल म्हणाल्या, तुम्ही सुतळी बॉम्ब खेळामध्ये. पुढे म्हणाल्या, मुलींमध्ये सगळ्यात स्ट्रॉंग प्लेयर आहात…”

त्यामुळे आज बघूया पुढे काय घडले घरामध्ये. बघत राहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

हेही वाचलंत का? 

Back to top button