पुढारी ऑनलाईन डेस्क
अभिनेता अभिषेक बच्चनचा बॉब बिस्वास (Bob Biswas) चित्रपट सध्या चर्चेत आहे. यामध्ये अभिषेकसोबत चित्रांगदा सिंह आणि टिना देसाई यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता रिलीज झालेल्या अनेक चित्रपट आणि वेब सीरीजमध्ये अनेक नवे चेहरे पाहायला मिळाले आहेत. यापैकी एक आहे बॉब बिस्वासमधील अभिनेत्री टिना देसाई. तिने यामध्ये (Bob Biswas) एका पोलिस इन्स्पेक्टरची भूमिका साकारलीय. टिना देसाई खऱ्याखुऱ्या आयुष्यात खूप फिट, बोल्ड आणि हॉट आहे. त्यामुळेच नेटकरी तिला पाहून विचारताहेत की, तिने इतकी सेक्सी फिगर आणली कुठून?
बॉब बिस्वासमध्ये पोलिस इन्स्पेक्टर असलेली टीना आपल्या अभिनयाची छाप सोडण्यास यशस्वी ठरलीय. तर बराच काळ कॅमेरापासून दूर असलेली अभिनेत्री चित्रांगदा सिंहने या चित्रपटातून वापसी केलीय.
टिना एक अभिनेत्री आणि मॉडल आहे. तिने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये आधीही काम केलंय. टिनाचा जन्म २४ फेब्रुवारी १९८७ मध्ये बंगळूरू, कर्नाटक येथे झाला. २०१२ मध्ये कॉमेडी-ड्रामा 'द बेस्ट एक्सोटिक मेरीगोल्ड हॉटेल' या इंग्रजी चित्रपटातून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. ती बॉलिवूडकडे वळली.
२०११ मध्ये थ्रीलरमध्ये 'ये फासले' मधून भारतीय करिअरची सुरुवात केली होती. तिने नेटफ्लिक्स सीरीज 'सेंस ८' मध्ये मुख्य भूमिकेत होती. बॉब बिस्वास एक बॉलीवूड ड्रामा आहे. दीया अन्नपूर्णा घोषने याचे दिग्दर्शन केले आहे. हा चित्रपट फिल्म गौरी खान, सुजॉय घोष आणि गौरव वर्माद्वारा निर्मित आहे.
ये फ़ासले, सही धंदे गलत बन्दे, कॉकटेल, द बेस्ट एक्सोटिक मेरीगोल्ड हॉटेल (इंग्रजी चित्रपट), टेबल नंबर २१, दशहरा, शराफ़त गई तेल लेने, मुंबई डायरीज 26/11 यासारख्या वेब सीरीज, कार्यक्रम, मालिकांमध्ये तिने काम केलं आहे.
चित्रपटाची कहाणी २०२१ मध्ये रिलीज झालेला चित्रपटाची थ्रीलर कहाणी आहे. यामध्ये एक किलर बॉब बिस्वास असतो. रुग्णालयातून बॉब बिस्वास ८ वर्षांनी कोमातून बाहेर आला आहे.
त्याला घरी घेऊन जाण्यासाठी त्य़ाची पत्नी (चित्रागंदा सिंह) मेरी आणि मुलगा बेनी आलेला असतो. बॉब शुध्दीवर आला आहे. पण, त्याला आपल्या माग[y आयुष्याविषयी काहीही आठवत नाहीये. पुढील कहाणी पाहण्यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
टिना मुळात फिटनेस फ्रिक आहे. ती योगासनांना प्राधान्य देते. कठिणातील कठीण योगाचे प्रकार देखील ती करते. तिचे योगा करतानाचे फोटो आणि व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळतात. आपला फिटनेस ठेवण्यासाठी बिझी कामातूनदेखील वेळ काढून ती योगा करते.