Inside Edge Season 3 ची सपना पब्बी इतकी ग्लॅमरस (Photo) पाहातचं राहाल - पुढारी

Inside Edge Season 3 ची सपना पब्बी इतकी ग्लॅमरस (Photo) पाहातचं राहाल

पुढारी ऑनलाईन डेस्क

Inside Edge Season 3 ही वेब सीरीज ३ डिसेंबरला Amazon Prime Video वर रिलीज झाली. Amazon या सीरीजचा (Inside Edge Season 3) आगामी सीझन ३ मध्ये IPL (पॉवर प्ले लीग) वर फोकस करण्यात आला आहे. ही सीरीजची निर्मिती रितेश सिधवानी, फरहान अख्तर यांच्या एक्सेल मीडिया अँड एंटरटेनमेंटने केली आहे.  कनिष्क वर्मा द्वारा दिग्दर्शित ही सीरीज आहे. यामध्ये विवेक ओबेरॉय, ऋचा चड्ढा, तनुज विरवानी, आमिर बशीर, सयानी गुप्ता, अक्षय ओबेरॉय, सिद्धांत गुप्ता आणि अमित सियाल यांच्या भूमिका आहेत. पण, आणखी एका अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष घेतले आहे. ती म्हणजे सपना पब्बी. सपना पब्बी हिने मंत्रा पाटील हिची भूमिका साकारलीय. ती रिअल लाईफमध्ये बोल्ड आणि खूप ग्लॅमरस आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी.

करण अंशुमनचीही वेब सीरीज ‘इनसाईड एज’ ची कहाणी भारतीय क्रिकेट बोर्ड (ICB) ची आहे. मोठे दादा यशवर्धन ‘भाईसाहेब पाटील’ (आमिर बशीर) हे क्रिकेटवर सट्‍टा खेळताना आपलीच मुलगी मंत्रा पाटील (सपना पब्बी) हिचा वापर करतात.

दुसरीकडे त्यांचा भाऊ क्रिकेट माफिया विक्रांत धवन (विवेक ओबेरॉय) कुठल्याही प्रकारे बाद करण्याच्या तयारी लागलेला असतो. यामध्ये सर्वात मोठा मोहरा म्हणून जरीना मलिक (ऋचा चड्ढा) काम करते. क्रिकेटमध्ये सट्टेबाजीचा खुलासा झाल्यानंतर पॉवर प्ले लीग (पीपीएल) च्या आयोजनावर टांगती तलवार दिसते. तिसरीकडे सट्टेबाजीच्या चौकशीसाठी राव कमिशन आपलं काम करत आहे.

या सीरीजमधील मंत्रा पाटीलची भूमिका साकारणाऱ्या सपनाने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. तुम्हाला माहिती आहे का, सपना एक मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. रिअल लाईफमध्ये ती खूप ग्लॅमरस आहे.

कोण आहे Sapna Pabbi?

सपना एक मॉडल आणि टीव्ही अभिनेत्री आहे. तिचा जन्म २० डिसेंबर, १९९२ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्याचे वडील खूप शिस्तप्रिय आहेत. सपनाला अभिनयात आवड असल्यामुळे शिक्षण पूर्ण होताचं ती भारतात आली. यानंतर तिने अनेक ब्रँडसाठी मॉडलिंग केले. यानंतर तिला टिव्ही मालिका घर आजा परदेसीमध्ये काम मिळालं.

चित्रपट करिअर

सपनाने आपल्या करिअरची सुरुवात खामोशियाँ चित्रपटातून केली होती. यामध्ये अली फजल आणि गुरमीत चौधरी यांच्या मुख्य भूमिका होत्या. पुढे सपना शुजित सरकारच्या सत्रह या चित्रपटात दिसली होती.

टीव्ही करिअर

सपना लंडनहून भारतात अभिनेत्री होण्यासाठी आली होती. तिने अनेक कमर्शियल जाहिराती केल्या. ती अभिनेता अनिल कपूरचा शो २४ मध्ये दिसली. या शोमध्ये तिने अनिल कपूरच्या मुलीची भूमिका साकारली होती.

 

 

Back to top button