डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दुर्मिळ क्षणचित्रांचा प्रवास

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दुर्मिळ क्षणचित्रांचा प्रवास
Published on
Updated on

महामानव तसेच घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय जनसमुदयावर विशेष प्रभाव आहे. भारतीय इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांच्या संघर्ष आणि प्रयत्नामुळे आज प्रत्येक भारतीय संविधनाच्या सहाय्याने आपल्या जीवनाला आकार देत आहे. संविधान हे त्यांच्याकडून मिळालेला एक अनमोल ठेवा आहे. अशा या महान नेत्यास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन… या दिवसांच्या औचात्याने आम्ही वाचकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या एैतिहासिक, दुर्मिळ आणि अनमोल अशा क्षणचित्रांचा प्रवास आपणा करिता…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशमधील इंदूरजवळ महू या छोट्याशा खेड्यात झाला. कबीर पंथाचे अनुयायी असणारे रामजी आंबेडकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९०८ मध्ये मॅट्रीक परीक्षा पास झाले.  त्यांचा विवाह रमाबाई यांच्याशी झाला. रमाबाई यांनी बाबासाहेबांना संघर्षाच्या काळात मोलाची साथ दिली

लंडन स्कूल ऑफ इकोनामिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्समधील प्राध्यापक व मित्रांसोबत डॉ. आंबेडकर…
लंडन स्कूल ऑफ इकोनामिक्स ॲन्ड पोलिटिकल सायन्समधील प्राध्यापक व मित्रांसोबत डॉ. आंबेडकर…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९१२ साली एल्फिन्स्टन महाविद्यालयातून बी.ए. झाले. यानंतर न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठातून एम.ए.पूर्ण केले. शिवाय नॅशनल डिव्हिडंट : ए हिस्टॉरिकल ॲन्ड ॲनालिटिकल स्टडी या विषयात त्यांनी डॉक्टरेट मिळवली. १९१६ साली लंडन स्कूल ऑफ इकॉनाॅमिक्समध्ये प्रवेश घेतला. तेथून त्यांनी एमएस्सी पदवी संपादन केली. पुढे ग्रेज इनमध्ये बार-ॲट-लॉसाठी प्रवेश घेतला. बॅरिस्टर इन लॉही पदवी घेतली. डीएससी आणि एलएलडी अशा पदव्यांसह त्यांनी ३२ हून अधिक पदव्या संपादन केल्या होत्या.

कुटुंबियांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुलगा यशवंत, पत्नी रमाबाई, वहिनी लक्ष्मीबाई व पुतण्या मुकुंदराव.
कुटुंबियांसमवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मुलगा यशवंत, पत्नी रमाबाई, वहिनी लक्ष्मीबाई व पुतण्या मुकुंदराव.

रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील अंबावडे हे त्यांच्या पूर्वजांचे गाव. त्यांच्या पूर्वजांनी इस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यामध्ये नोकरी केली. वडील रामजी यांनी देखिल सैन्यात नोकरी केली व सुभेदार पदावर असताना त्यांनी निवृत्ती स्विकारली. रामजींचे कुंटुब काही काळ रत्नागिरी त्यांनतर सातारा व १९०४ साली मुंबईमध्ये राहण्यास आले. १८९६ साली बाबासाहेब ६ वर्षाचे असताना त्यांच्या आई भीमाई यांचे निधन झाले.

२७ मे १९३५ रोजी रमाबाई आंबेडकरांचे निधन झाले. अंतयात्रेवेळी शोकाकूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कुटुंबिय तसेच चळवळीतील कार्यकर्ते…
२७ मे १९३५ रोजी रमाबाई आंबेडकरांचे निधन झाले. अंतयात्रेवेळी शोकाकूल डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांचे कुटुंबिय तसेच चळवळीतील कार्यकर्ते…

रमाबाई यांनी बाबासाहेबांना पत्नी अर्धांगिनी म्हणून खूप मोठा आधार दिला होता.

दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (खांडके बिल्डिंग) येथील सार्वजनिक गणेश पूजनचा हक्क मिळविलेल्या कार्यकर्त्यांसमवेत दादरच्या टिळक पुलाच्या पायऱ्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
दादर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, (खांडके बिल्डिंग) येथील सार्वजनिक गणेश पूजनचा हक्क मिळविलेल्या कार्यकर्त्यांसमवेत दादरच्या टिळक पुलाच्या पायऱ्यांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

स्वतंत्र भारत हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचेही स्वप्न होते. पण, जातिग्रस्त आणि सनातनी देशाला कधीही स्वतंत्र म्हणता येणार नाही. म्हणूनच त्यांच्या कार्यपटलामध्ये केवळ सामाजिक सुधारणाच नव्हे तर समानता आणि स्वातंत्र्य यावर आधारित भारतीय समाजव्यकस्थेचाही समावेश होता.

कर्मवीर भाऊराव पाटील व गाडगेबाबां समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
कर्मवीर भाऊराव पाटील व गाडगेबाबां समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बहुजन समाजाला शिक्षणांच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. अनेक बहुजनांसाठी ज्ञानाची कवाडे खूली करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. तसेच संत गाडगेबाबा यांनी आपल्या प्रवचनातून बहुजन समाजाला धर्म, जात, रुढीपरंपरा, अंध्दश्रद्धा यातून जागे होण्याची चेतना दिली. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ तळागाळातल्या रंजलेल्या, गांजलेल्या अस्पृश्य, बहुजन समाजास जागे करण्याची होती. या तिघांनी एकमेकांना साथ देत एकमेकांना बळ दिले.

समता सैनिक दल व स्वतंत्र मजूर पक्षांच्या कार्यकर्त्यां समवेत डॉ. आंबेडकर.
समता सैनिक दल व स्वतंत्र मजूर पक्षांच्या कार्यकर्त्यां समवेत डॉ. आंबेडकर.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सप्टेंबर १९२७ मध्ये समाज समता संघ आणि डिसेंबर १९२७ मध्ये समता सैनिक दलाची स्थापना केली. या संस्था सामजिक समतेसाठी कार्य करत होत्या.

व्हाईसरॉय लार्ड वेव्हेल व त्यांचे कार्यकारी मंडळ (केंद्रीय मंत्रीमंडळ) भारतमंत्री लार्ड पेथिक लॉरेन्स यांच्या भारत भेट प्रसंगी…
व्हाईसरॉय लार्ड वेव्हेल व त्यांचे कार्यकारी मंडळ (केंद्रीय मंत्रीमंडळ) भारतमंत्री लार्ड पेथिक लॉरेन्स यांच्या भारत भेट प्रसंगी…
पेरियार रामस्वामी नायकार यांच्यासमवेत हास्यमुद्रेत डॉ. आंबेडकर
पेरियार रामस्वामी नायकार यांच्यासमवेत हास्यमुद्रेत डॉ. आंबेडकर

तामिळनाडूमध्ये ई. व्ही. रामास्वामी उर्फ पेरियार यांना तेथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणूनच समजले जाते. जाती अंताच्या लढाईसाठी त्यांनी मोठे काम केले. जे काम बाबासाहेबांनी भारतभर केले त्याच कामाला दक्षिणेत कार्य पेरियार यांनी केले.

भारताचे गव्हर्नर जनरलपदी रागोपालाचारी यांची नियुक्ती झाल्यावर एका भोजन समारंभारत मा. पं. जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
भारताचे गव्हर्नर जनरलपदी रागोपालाचारी यांची नियुक्ती झाल्यावर एका भोजन समारंभारत मा. पं. जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्या समवेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर..
मिलिंद महाविद्यालयात बांधकामावेळी (डावीकडून) आर्किटेक्ट नार्वेकर, प्राचार्य ना. मि. चिटणीस, माई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कमलाकांत चित्रे आणि बी. एस. वराळे
मिलिंद महाविद्यालयात बांधकामावेळी (डावीकडून) आर्किटेक्ट नार्वेकर, प्राचार्य ना. मि. चिटणीस, माई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कमलाकांत चित्रे आणि बी. एस. वराळे
केंद्रीय मंत्रीमंडळासमवेत डॉ. आंबेडकर सोबत मौलाना आझाद, पं. नेहरु, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल
केंद्रीय मंत्रीमंडळासमवेत डॉ. आंबेडकर सोबत मौलाना आझाद, पं. नेहरु, डॉ. राजेंद्र प्रसाद, वल्लभभाई पटेल
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडून शपथ ग्रहण करताना…
स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मा. राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्याकडून शपथ ग्रहण करताना…
घटना मसुदा समितीच्या सदस्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डावीकडून) एन माधवराव, सय्यद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बी.एन.राव (सल्लागार)
घटना मसुदा समितीच्या सदस्यांसोबत डॉ. बाबासाहेब आंबेडकर (डावीकडून) एन माधवराव, सय्यद सादुल्ला, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, बी.एन.राव (सल्लागार)
घटना परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
घटना परिषदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय राज्यघटनेचा अंतिम मसुदा सादर करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
कोलंबिया विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांना ' डॉक्टर ऑफ लॉज' (एल.एल.डी) ही उपाधी दिली. हा सन्मान स्वीकारताना बॅलेस स्टिव्हन्स यांच्यासह डॉ. आंबेडकर.
कोलंबिया विद्यापीठाने डॉ. आंबेडकरांना ' डॉक्टर ऑफ लॉज' (एल.एल.डी) ही उपाधी दिली. हा सन्मान स्वीकारताना बॅलेस स्टिव्हन्स यांच्यासह डॉ. आंबेडकर.
एका स्वागत समारंभातील विशेष क्षण, रावबहादूर सी.के.बोले यांना बसायला जागा नसल्याने डॉ. आंबेडकरांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेतले. खळखळून हासतानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मीळ मुद्रा
एका स्वागत समारंभातील विशेष क्षण, रावबहादूर सी.के.बोले यांना बसायला जागा नसल्याने डॉ. आंबेडकरांनी त्यांना आपल्या मांडीवर बसवून घेतले. खळखळून हासतानाची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची दुर्मीळ मुद्रा
आचार्य अत्रे दिग्दर्शित 'महात्मा फुले' चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आली. त्या प्रसंगी सुलोचना, बाबूराव पेंढारकर आणि आचार्य अत्रे व इतर…
आचार्य अत्रे दिग्दर्शित 'महात्मा फुले' चित्रपटाच्या शुटींगची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते करण्यात आली. त्या प्रसंगी सुलोचना, बाबूराव पेंढारकर आणि आचार्य अत्रे व इतर…
धर्मांतराचा सुवर्णक्षण
धर्मांतराचा सुवर्णक्षण

डॉ. बाबासाहेब यांनी स्वातंत्र्य, समानता आणि विश्वबंधुत्व हे त्यांच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे आणि ते मी गुरुस्थानी असलेल्या भगवान बुद्धाकडून मिळवलेले आहे. असे सांगत बौद्ध धर्म स्वीकारत असल्याचे जाहीर केले. १४ ऑक्टोंबर १९५४ साली नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.

धर्मांतराचा सुवर्णक्षण, महास्थवीर भिख्खू चंद्रमणी यांच्या समवेत डॉ. आंबेडकर
धर्मांतराचा सुवर्णक्षण, महास्थवीर भिख्खू चंद्रमणी यांच्या समवेत डॉ. आंबेडकर

१४ ऑक्टोंबर १९५६ रोजी महास्थवीर भिख्खू चंद्रमणी यांनी त्रिशरण आणि पंचशील ह्यांचा पाठ केला आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या पत्नी डॉ. शारदा यांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली.

संदर्भ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चित्रमय चरित्र
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड – २२
संपादक : प्रा. हरी नरके

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news