Cannes 2023 : कान्समधून सनी लिओनीचे फोटो समोर, फॅशन प्रेमी पडले प्रेमात

सनी लिओनी sunny leone
सनी लिओनी sunny leone

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सनी लिओनने तिच्या फॅशन-फॉरवर्ड लुकने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सगळ्यांची मने जिंकून घेतली आहेत. (Cannes 2023) तिच्या फॅशन निवडींसाठी आणि ट्रेंड-सेटिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या, सनीच्या प्रेमात फॅशन प्रेमी प्रेमत पडले आहे. प्रतिष्ठित इव्हेंटमध्ये तिने रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली आणि फॅशन प्रेमींना आश्चर्यकित करून सोडलं. (Cannes 2023) 

विशेष मिडनाईट स्क्रिनिंगसाठी निवडलेल्या तिच्या "केनेडी" चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती आली होती. यावेळी तिने फॅशन विश्वात तिच्या फॅशनने सगळ्यांना भुरळ घातली.

तिच्या स्टँडआऊट लूकपैकी एक जल्फर मिलाओ लेयर्ड कोल्ड-शोल्डर ड्रेस पॅटर्न अगदीच खास दिसतो. यावेळी तिने काळ्या स्ट्रेपी हिल्स घातल्या होत्या. सनीच्या फॅशनच्या चॉईससाठी ती सगळीकडे चर्चेचा विषय ठरते आहे. तिच्या प्रत्येक नवीन लूकची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

सनी लिओनी sunny leone
सनी लिओनी sunny leone

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news