प्रेग्नेसीमध्ये दीपिका पदुकोनचे Wow फोटोशूट, फॅन्सना खास मेसेज | पुढारी

प्रेग्नेसीमध्ये दीपिका पदुकोनचे Wow फोटोशूट, फॅन्सना खास मेसेज

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पदुकोनने आपल्या प्रेग्नेसी डायरीची सुरुवात फोटोशूटने केली आहे. यलो कलरच्या ड्रेसमध्ये तिने फोटोशूट केले आहे. तिचे हे फोटोज तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पाहायला मिळत आहेत. सनशाईन आऊटफिटमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे. दीपिका पदुकोन मॅटर्निटी पिरीयड एन्जॉय करत आहे. तिचा पती, अभिनेता रणवीर सिंहदेखील तिची खूप काळजी घेताना दिसतो. या स्टार कपलने २९ फेब्रुवारीला ते आई-बाबा होणार असल्याचे जाहीर केलं आहे. त्यांनी सप्टेंबरमध्ये पहिल्या बाळाच्या आगमनाचा महिना जाहीर केला होता. तशी पोस्ट दोघांनी सोशल मीडियावरून दिली होती.

अधिक वाचा-

दीपिकाची लक्षवेधी पोस्ट

दीपिका पादुकोणने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये दीपिकाने लिहिलं, “हाय, मी उद्या लाईव्ह येत आहे…तर सोबत राहा.” दीपिकाने आपल्या लाईव्ह सेशनच्या पोस्टमध्ये दुसरा कोणता मेसेज लिहिला नाही. अशात तिचे फॅन्स जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, अभिनेत्री लाईव्ह येऊन काय बोलणार आहे. काय ती ट्रोलर्सना फटकारणार आहे? कारण, जेव्हा ती रणवीर सिंहसोबत मतदानाला गेली, त्यावेळी तिचे बेबी बंप दिसले. त्यामुळे अनेकांना वाटले की, तिचे बेबी बंप फेक आहे. तिला यावरून ट्रोल देखील करण्यात आले होते. तिच्या पोस्टनुसार दीपिका पदुकोन आज २४ मे रोजी इन्स्टाग्रामवर लाईव्ह येईल.

अधिक वाचा-‘भाबी जी घर पर हैं’ अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

दीपिका पदुकोन सिंघम अगेनमध्ये …

दीपिका पदुकोनला शेवटी ऋतिक रोशन सोबत चित्रपट ‘फायटर’ मध्ये पाहण्यात आले होते. ती लवकरच ‘कल्कि २८९८ एडी’ मध्ये दिसणार आहे. दीपिका रोहित शेट्टीच्या ‘सिंघम अगेन’ मध्ये दिसणार आहे. ‘सिंघम अगेन’मध्ये दीपिका पादुकोण लेडी कॉप अवतारात दिसेल.

अधिक वाचा-‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ यादिवशी ओटीटीवर पाहता येणार

video-viral bhayani instaवरून साभार

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

Back to top button