Singham Again : रुबाबदार..तडफदार अजय देवगनचा पहिला सिंघम लूक समोर | पुढारी

Singham Again : रुबाबदार..तडफदार अजय देवगनचा पहिला सिंघम लूक समोर

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजय देवगनची ‘संघम अगेन’ची पहिली झलक समोर आली आहे, ती पाहून तुम्हाला सूर्यवंशीच्या ‘बाजीराव सिंघम’ची आठवण होईल. सध्या जम्मू-काश्मीरमध्ये अजय देवगणच्या आगामी ‘सिंघम अगेन’ चित्रपटाचे शूटिंग सुरू आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जे पाहून तुम्हाला अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाची आठवण येईल.

अधिक वाचा – Shah Rukh Khan : डिस्चार्जनंतर शाहरुख खान कुटुंबासह मुंबईत दाखल

रोहित शेट्टी सिंघम अगेनची शूटिंग जम्मू-काश्मीरमध्ये करत आहे. दरम्यान, रोहित शेट्टी आणि अजय देवगनने जम्मू काश्मीरमध्ये तैनात SSB (सशस्त्र सीमा दल) जवानांची भेट घेतली. या भेटीचे काही फोटो समोर आले आहेत. रोहित शेट्टी आणि अजय देवगनचे फोटो SSB च्या अधिकृत एक्स अकाऊंटवर आहेत. फोटोज आणि व्हिडिओजसोबत लिहिलं-प्रसिद्ध स्टार अजय देवगन आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी आपल्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान डिग्नीबलमध्ये SSB च्या जवानांसोबत वेळ घालवला. या फोटोंमध्ये अजय देवगन बाजीराव सिंघमच्या भूमिकेत दिसत असून त्याचा लष्करासमवेत फोटो दिसत आहे.

अधिक वाचा – ‘भाबी जी घर पर हैं’ अभिनेता फिरोज खान यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अर्जुन कपूर शूटिंग संपताच काय म्हणाला?

अर्जुन कपूर सिंघम अगेनमध्ये विलेनच्या भूमिकेत आहे. एका आठवड्याआधी त्याने आपल्या हिश्श्याचे शूटिंग पूर्ण केले आहे. शूटिंग संपताच अर्जुनने पोस्ट शेअर करून याबद्दलची माहिती दिली. सिंघम अगेन रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्सचा पाचवा चित्रपट आहे. याआधी सिंघम, सिंघम रिटर्न, सिंबा, सूर्यवंशी रिलीज झाला आहे. या चित्रपटामध्ये रोहित शेट्टी आपल्या कॉप युनिव्हर्सच्या सर्व हिरोजना एकत्र आणत आहे. चित्रपटात अजय देवगन, अक्षय कुमार, रणवीर सिंह, दीपिका पादुकोण, अर्जुन कपूर, करीना कपूर, टायगर श्रॉफ यासारखे कलाकारांच्या भूमिका आहेत.

अधिक वाचा – Shahrukh Khan : शाहरुख खानची प्रकृती बिघडली, अहमदाबादच्या रुग्णालयात ॲडमिट

 

View this post on Instagram

 

A post shared by Rohit Shetty (@itsrohitshetty)

Back to top button